नंदुरबार l प्रतिनिधी
विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण अभ्यास केला. कठोर परिश्रम घेतले तर स्पर्धा परीक्षा असो की कोणत्याही परीक्षेत यश हे निश्चितच मिळते.” असे प्रतिपादन नंदुरबार जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे यांनी मराठा पाटील समाज मंडळ नंदुरबार विद्यमाने स्व.जी.टी.पाटील ( बापूजी) यांच्या पुण्यतिथीनिमित्त समाजातील गुणवंत विद्यार्थी तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाज बांधवांना शाहीर हरीभाऊ मराठा पाटील मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात गौरविण्यात आले.
अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य बी.एस्.पाटील होते.प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.चारुदत्त शिंदे उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन व स्व.जी.टी.पाटील यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले.प्रास्ताविकात मंडळाचे सचिव यशवंतराव पाटील यांनी स्व.जी.टी.पाटील यांच्या कार्यकर्तृत्वाचा आलेख समाज बांधवासमोर मांडला.
व्यासपीठावर प्रमुख अतिथी सह मंडळाचे उपाध्यक्ष विश्वास पाटील कोषाध्यक्ष एस्.आर.पाटील शालिग्राम पाटील होते.
प्रमुख अतिथींचा शाल सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
प्रमुख अतिथींचा परिचय प्रा.राजेंद्र शिंदे, प्रभाकर नांद्रे यांनी करुन दिला. मराठा पाटील समाज मंडळाकडून समाजातील साठ गुणवंतांना सन्मान चिन्ह व शहीद शिरीष कुमार ग्रंथ भेट देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा डॉ.माधव कदम , नरेंद्र पाटील यांनी केल
अध्यक्षपदावरून बोलताना प्राचार्य बी.एस्.पाटील म्हणाले की ” समाजातील जीर्ण रूढी परंपरेला फाटा दिला पाहिजे.सामुदायिक विवाह, वधुवर सुचक मेळावा, विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आदी.समाज परिवर्तनाच्या कार्याला गती देण्यासाठी सुशिक्षित तरुणांनी पुढाकार घेतला पाहिजे असे सांगितले.
यावेळी समाज मंडळाचे संचालक निंबाजीराव बागुल, मधुकर पाटील,पी.आर्.पाटील , राजेंद्र बागुल, आर्.डी.मोरे, जी.एन्.पाटील ,एन्.डी.नांद्रे, विलास अहिरराव, रोहिदास जाधव,आर.बी.पाटील,प्रकाश पाटील, श्रीराम बोरसे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी एस्.एन्.पाटील, राजेंद्र एन्.पाटील,डी.व्ही.सोनवणे , वसंत पाटील, रावसाहेब पाटील भाग्यचिंतन हायस्कूलचा स्टाफ आदिंनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमास जेष्ठ साहित्यिक डॉ पीतांबर सरोदे,प्रा.गुलजारसिंग राजपूत, पेन्शनर संघटनेचे अध्यक्ष मधुकर साबळे, पत्रकार गो.पी. लांडगे, बहुसंख्य विद्यार्थी,पालक, समाज बांधव पत्रकार, शहरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.








