नंदुरबार l प्रतिनिधी
वाचनातूनच व्यक्तिमत्त्वाची जडणघडण होत असून आयुष्यात वाचनाला प्रथम प्राधान्य दिले पाहिजे असे प्रतिपादन ज.ग.नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयांतील प्राध्यापक डॉ गिरीश पवार यांनी ज ग नटावदकर महाविद्यालयात आयोजित वाचन प्रेरणा दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना केले. यावेळी त्यांनी प्रत्येक घरात देवालयासोबतच वाचनालय असण्याची गरज असल्याचे सांगितले.यावेळी विद्येची देवता सरस्वती माता व स्व डॉ अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पर्यवेक्षक प्रा एस के चौधरी होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा सौ वर्षा घासकडबी यांनी केले.वाचन प्रेरणा दिनाचे महत्त्व तसेच स्व डॉ अब्दुल कलाम यांच्या इस्त्रोतील यशस्वी कामगिरीबद्दल त्यांनी मुलांना माहिती दिली. या कार्यक्रमात ७ विद्यार्थी, विद्यार्थीनींनी आपले मनोगत व्यक्त केले.मी वाचलेले पुस्तक याविषयी मुलांनी समर्पक माहिती यावेळी दिली. अध्यक्षीय समारोप करताना प्रा.एस के चौधरी यांनी अवांतर वाचनाबरोबर क्रमिक अभ्यासक्रमाची पुस्तके देखील वाचावीत असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.धनश्री दीक्षित यांनी केले तर आभार प्रा.सौ मिनल वसावे यानी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले . प्राचार्या सौ.सुहासिनी नटावदकर यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.