नंदुरबार l प्रतिनिधी
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात श्रीरामपूर ता.जि .नंदुरबार या ग्रामपंचायतीने उत्कृष्ट काम केले आहे . श्रीरामपूर गावाला मॉडेल गाव करून जिल्ह्यातील इतर गावांसाठी आदर्शवत होईल यासाठी प्रयत्न करावेत . स्वच्छतेतून समृद्धीकडे घेऊन जाण्यासाठी संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान हा उत्कृष्टमार्ग आहे . यासाठीच जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीनी संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित यांनी केले आहे.
संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान सन 2023 -24 चा शुभारंभ जिल्हा परिषदेच्या याहामोगी सभागृहात करण्यात आला.याप्रसंगी उपस्थिताना मार्गदर्शन करताना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित बोलत होत्या .यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार, महिला व बालकल्याण सभापती संगीता गावित , समाजकल्याण समिती सभापती शंकर पाडवी,जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक एम.डी. धस, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय बाविस्कर उपस्थित होते.
प्रारंभी संत गाडगेबाबा व राष्ट्र संत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.यानंतर संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान अतर्गत राज्यस्तरिय स्पर्धेसाठी पात्र झालेल्या श्रीरामपूर ता.जि .नंदुरबार या ग्रामपंचायतीचे सरपंच यशवंत गांगुर्डे ,उपसरपंच निलेश अहिरे व ग्रामसेविका रुपाली देवरे यांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले .
यावेळी उपस्थिताना मार्गदर्शन करताना अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित पुढे म्हणाल्या कि ,स्वच्छतेच्या सवयी या बालपणापासून त्यांच्या मनावर रुजविणे आवश्यक आहे .त्यासाठी प्रत्येक गावात शालेय स्तरापासून अभियानस प्रारंभ करण्यात यावा.तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरील स्वच्छता हि महत्वाची आहे .या दोन्ही घटकावर स्वच्छतेचे काम केल्यास गावे अधिक स्वच्छ होण्यास मदत होईल .स्वच्छतेबरोबरच पर्यावरणाचे संतुलन रक्ण्यासाठी सर्व ग्रामपंचायतीनी वृक्ष लागवडीवर भर द्यावा असे आवाहनही यावेळी अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित यांनी केले. प्रास्ताविक जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक एम.डी. धस यांनी केला तर आभार जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सुनील पाटील यांनी केले.कार्यक्रमास सर्व विभागप्रमुख ,लोकप्रतिनिधी व जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कशाचे कर्मचारी उपस्थित होते .








