Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जिल्ह्यातून शिवसेनेचे २ आमदार देऊ : उद्योग मंत्री उदय सामंत

team by team
October 20, 2023
in राजकीय
0
जिल्ह्यातून  शिवसेनेचे २ आमदार देऊ : उद्योग मंत्री उदय सामंत

नंदुरबार l प्रतिनिधी

सध्या ३ पक्षाचे सरकार आहे. महाविकास आघाडीच खरा शत्रू आहे. विरोधाला विरोध न करता कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करावे.राज्यात आगामी निवडणुकीत ४५ खासदार व २०० पेक्षा अधिक आमदार महायुतीचे निवडून येणार असून,जिल्ह्यातून २ आमदार शिवसेनेचे असतील असा आत्मविश्वास उद्योग मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला.

नंदुरबार येथे शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात घेण्यात आलेल्या मेळावा प्रसंगी ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले, नंदुरबार जिल्ह्यात शिवसेना मजबूत करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. महाराष्ट्राला महाविकास आघाडीने खड्ड्यात घातले आहे. त्यामुळे तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना शत्रू समजावे. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचार पुढे नेण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करीत आहेत.आगामी निवडणुकांमध्ये कोणाला तिकीट द्यायचे याचा विचार कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांवर सोडून द्यायचा.

यावेळी माजी नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी, शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड.राम रघुवंशी, शिवसेना जिल्हाप्रमुख किरसिंग वसावे, जिल्हा परिषदेचे माजी अधक्ष वकील पाटील, पंचायत समितीच्या सभापती दीपमाला भील,जि.प सदस्य विजय पराडके, शेतकी संघाचे चेअरमन बी.के पाटील, माजी उपनगराध्यक्ष कुणाल वसावे, धडगावचे नगराध्यक्ष धनसिंग पावरा, शिवसेना महिला जिल्हा प्रमुख ज्योती पाटील, बाजार समितीचे सभापती विक्रमसिंह वळवी,शिवसेना तालुका प्रमुख डॉ.सयाजीराव मोरे, शेतकी संघाचे संचालक सुरेश शिंत्रे, युवा सेना जिल्हाप्रमुख योगेश पाटील आदी उपस्थित होते. मेळाव्याला जि.प सदस्य,नगरसेवक, पं.स सदस्य, विविध कार्यकारी सोसायटीचे पदाधिकारी,सरपंच, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

३ हजार युवकांच्या १५०० कुटुंबीयांना रोजगार

जिल्ह्यात बेरोजगारांचे प्रमाण जास्त असल्यामुळे शेजारील गुजरात राज्यात मोठ्या प्रमाणावर कुटुंब स्थलांतरित होत असतात तत्कालीन उद्योग मंत्री नारायण राणे यांनी भालेर येथे २९७ हेक्टर क्षेत्रावर एमआयडीसी मंजूर केली होती. परंतु, त्यातही राजकारण झाले. युवकांना रोजगार मिळावा यासाठी भालेर एमआयडीसीमध्ये औद्योगिक प्रकल्प उभारून ३ हजार जणांच्या १५०० कुटुंबीयांना रोजगार उपलब्ध करून देणार असल्याचे माजी आ.रघुवंशी यांनी सांगितले.

बातमी शेअर करा
Previous Post

उद्योगांना जमीन देणाऱ्या आदिवासी भूमिपुत्रांना रोजगार देणे बंधनकारक :उद्योगमंत्री उदय सामंत

Next Post

ग्रामपंचायतीनी संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात सहभाग नोंदवावा : डॉ. सुप्रिया गावित

Next Post
ग्रामपंचायतीनी  संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात सहभाग नोंदवावा : डॉ. सुप्रिया गावित

ग्रामपंचायतीनी संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात सहभाग नोंदवावा : डॉ. सुप्रिया गावित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात

August 15, 2026
८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मिशन विद्यालयात विविध कार्यक्रम

८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मिशन विद्यालयात विविध कार्यक्रम

August 15, 2026
नंदुरबारच्या सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयासाठी स्वतंत्र अधिकारी देणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही

नंदुरबारच्या सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयासाठी स्वतंत्र अधिकारी देणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही

August 15, 2026
विकासाची नवी वाट दाखविणारे नेतृत्व : डॉ. विजयकुमार गावित

विकासाची नवी वाट दाखविणारे नेतृत्व : डॉ. विजयकुमार गावित

August 15, 2026
जिल्ह्यातील अपूर्ण विकासकामे ऑक्टोबरअखेर पूर्ण करा : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे निर्देश

जिल्ह्यातील अपूर्ण विकासकामे ऑक्टोबरअखेर पूर्ण करा : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे निर्देश

August 15, 2026
घोटाणे येथे  ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत डॉ. हिना गावित यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली

घोटाणे येथे ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत डॉ. हिना गावित यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली

August 14, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add