नंदुरबार l प्रतिनिधी
महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट असोसिएनच्यावतीने हिंगोली येथे होणार्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी येथील सेंट मदर तेरेसा शाळेचा संघाची निवड झाली असून सदर संघ नंदुरबार जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.
नंदुरबार जिल्हा टेनिसबॉल क्रिकेट असोसिएशनच्यावतीने हिंगोली येथे होणार्या मिनी सब ज्युनियर (१४ वर्ष मुले/मुली) व सब ज्युनिअर (१७ वर्ष मुले/मुली) टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेसाठी नंदुरबार जिल्हा अजिंक्यपद टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन येथील यशवंत विद्यालय नंदुरबार येथे करण्यात आले होते. सदर क्रिकेट स्पर्धेसाठी जिल्ह्याभरातून विविध शाळेतील खेळाडू मुला मुलींचे संघ उपस्थित होते. स्पर्धेत सेंट मदर तेरेसा शाळेतील १४ वर्षा आतील चिमुकल्या मुलींनी प्रथम क्रमांकाची ट्रॉफी जिंकुन शाळेचे नाव लौकीक केले.
त्यांच्या या चमकदार कामगिरी बद्दल जिजामाता एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ.अभिजित मोरे यांनी विजयी खेळाडूंचे अभिनंदन केले. यावेळी शाळेच्या मुख्याधापिका शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते. सर्व यशस्वी खेळाडूंना क्रीडा शिक्षक संतोष मराठे सर यांचे मार्गदर्शन लाभले. मुलींचा विजयी संघ आणि त्याच बरोबर १७ वर्षा आतील ६ मुलांची सुद्धा निवड झाली आहे. त्यामध्ये सोम्या नाथांनी, आदित्य पटेल, उत्कर्ष पाटील, दक्ष माळी, अक्षय सोनार व रोहन मराठे यांची देखील निवड झाली आहे.