Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबारचे पालकमंत्री ना.अनिल पाटील यांचा क्रांतीवीर बिरसा मुंडांची प्रतिमा देवून राष्ट्रवादीतर्फे सत्कार

team by team
October 9, 2023
in राजकीय
0
नंदुरबारचे पालकमंत्री ना.अनिल पाटील यांचा क्रांतीवीर बिरसा मुंडांची प्रतिमा देवून राष्ट्रवादीतर्फे सत्कार

नंदुरबार l प्रतिनिधी

राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांची नंदुरबार जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्याने नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या वतीने आदिवासी क्रांतीवीर बिरसा मुंडा यांची प्रतिमा भेट देवून पालकमंत्री ना.अनिल पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी युवक जिल्हाध्यक्ष सिताराम पावरा यांनी क्रांतीवीर बिरसा मुंडा यांची प्रतिमा भेट दिली.

राज्यातील 12 जिल्ह्यांमधील पालकमंत्र्यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांचे खंदे समर्थक असलेले अमळनेरातील राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांची नंदुरबार जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाली आहे. अमळनेर येथे जावून राष्ट्रवादी काँग्रेसचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे यांच्या नेतृत्वाखाली नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सिताराम नुरला पावरा व सर्व पदाधिकार्‍यांनी पालकमंत्री ना.अनिल पाटील यांचा सत्कार केला.

यावेळी आदिवासी समाजाचे दैवत असलेले क्रांतीवीर बिरसा मुंडा यांची भव्यदिव्य असलेली आकर्षक प्रतिमा नंदुरबारचे पालकमंत्री अनिल पाटील यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष सिताराम पावरा यांनी दिली. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे, जि.प.सदस्य मोहन शेवाळे व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री पदाची जबाबदारी ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंत्री सोपविण्यात आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त करण्यात आला.

बातमी शेअर करा
Previous Post

राज्यात आरोग्य व्यवस्थेचे वाजले तीन तेरा : आ. आमश्या पाडवी

Next Post

उद्या होणारी मुलाखत स्थगित : मंदार पत्की

Next Post
उद्या होणारी मुलाखत स्थगित : मंदार पत्की

उद्या होणारी मुलाखत स्थगित : मंदार पत्की

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

April 26, 2026
२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

April 26, 2026
शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

April 26, 2026
नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

April 26, 2026
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

April 26, 2026
जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add