Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

राज्यात आरोग्य व्यवस्थेचे वाजले तीन तेरा : आ. आमश्या पाडवी

team by team
October 9, 2023
in राजकीय
0
राज्यात आरोग्य व्यवस्थेचे वाजले तीन तेरा :  आ. आमश्या पाडवी

नंदूरबार l प्रतिनिधी

देशातील सामान्य जनता ही महागाई आणि बेरोजगारीने झुंजत असतांना मात्र केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार आणि राज्यातील कठपुतली शिंदे सरकार हे आपल्या मस्तीत आहेत. राज्यात आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा वाजत आहेत मात्र आरोग्य मंत्र्यांना रुग्णालयांकडे पाहण्यास वेळ नाही त्यामुळे आरोग्य यंत्रणाच आजारी पडल्याची राज्यात स्थिती आहे त्यामुळे या दोन्ही सरकारांना त्यांची जागा दाखविण्याची वेळ जवळ येत आहे असे प्रतिपादन विधान परिषदेचे सदस्य आ. आमश्या पाडवी यांनी केले.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सोरापाडा येथील श्री कालिका माता मंदिराच्या भव्यसभा मंडपात होऊ द्या चर्चा व युवती संवाद सभा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी आ.पाडवी बोलत होते. शिवसेनेचे जिल्हा संघटक लक्ष्मण वाडीले, नंदुरबार जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती शंकर पाडवी, राज्य वक्ता नाना तिडके, जिल्हा उप प्रमुख मंगलसिंग वळवी, शेतकरी सहकारी संघाचे चेअरमन पृथ्वीसिंग पाडवी, तालुकाप्रमुख मगन वसावे, युवा सेनेच्या जिल्हा विस्तारक कामिनी देसले, राज्य सहसचिव मालती वळवी, जिल्हा युवा समन्वयक रोहित चौधरी, युवा जिल्हधिकारी ललित जाट, हिरामण पाडवी, तालुका उपप्रमुख तुकाराम वळवी, नटवर पाडवी, सरपंच संघटनेचे माजी अध्यक्ष राजेंद्र वसावे, विनोद वळवी, शहर प्रमुख रावेंद्रसिंह चंदेल, खापरचे माजी सरपंच जोलु वळवी किरण चौधरी, आदी उपस्थित होते.

यावेळी राज्यात व देशात सुरु असलेली हुकूमशाही ,महागाई बेरोजगारी भ्रष्टाचार रोजगारांचे खाजगीकरण, शैक्षणिक संस्थांचे खाजगीकरण, गगनाला भिडणारी महागाई, अशा विविध विषयांवर होऊ द्या चर्चेच्या माध्यमातून वाचा फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी लक्ष्मण वाडीले, विस्तारक कामिनी देसले, ललित जाट, मालती वळवी, हिरामण पाडवी, यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले होऊ द्या चर्चेच्या यशस्वीतेसाठी तालुक्यातील शिवसेनेचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शिवसैनिकांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा
Previous Post

राज्यस्तरीय १६ वी अजिंक्य स्पर्धेचे मुलांच्या व मुलींच्या गटात धुळे संघाने पटकविला प्रथम क्रमांक

Next Post

नंदुरबारचे पालकमंत्री ना.अनिल पाटील यांचा क्रांतीवीर बिरसा मुंडांची प्रतिमा देवून राष्ट्रवादीतर्फे सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026
अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

April 25, 2026
महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना  महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

April 25, 2026
दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

April 25, 2026
मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add