नंदुरबार l प्रतिनिधी

राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांची नंदुरबार जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्याने नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या वतीने आदिवासी क्रांतीवीर बिरसा मुंडा यांची प्रतिमा भेट देवून पालकमंत्री ना.अनिल पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी युवक जिल्हाध्यक्ष सिताराम पावरा यांनी क्रांतीवीर बिरसा मुंडा यांची प्रतिमा भेट दिली.
राज्यातील 12 जिल्ह्यांमधील पालकमंत्र्यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांचे खंदे समर्थक असलेले अमळनेरातील राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांची नंदुरबार जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाली आहे. अमळनेर येथे जावून राष्ट्रवादी काँग्रेसचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे यांच्या नेतृत्वाखाली नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सिताराम नुरला पावरा व सर्व पदाधिकार्यांनी पालकमंत्री ना.अनिल पाटील यांचा सत्कार केला.
यावेळी आदिवासी समाजाचे दैवत असलेले क्रांतीवीर बिरसा मुंडा यांची भव्यदिव्य असलेली आकर्षक प्रतिमा नंदुरबारचे पालकमंत्री अनिल पाटील यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष सिताराम पावरा यांनी दिली. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे, जि.प.सदस्य मोहन शेवाळे व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री पदाची जबाबदारी ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंत्री सोपविण्यात आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त करण्यात आला.









