नंदुरबार | प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील लोणखेडा येथील ३० वर्षीय महिला व तीचे पाच मुले दिड महिन्यापासुन बेपत्ता होते. हरविलेली महिला व तिच्या ५ बालकांचा शोध घेत सुरत येथुन त्यांना ताब्यात घेण्यात आले.सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे.
शहादा पोलीस ठाण्यात मिसिंग क्रमांक ४१/२०२१ मधील मिसिंग महिला आरती संजय पाथरवट (३०) धुणेभांडी कामासाठी जाते असे सांगून तिची ५ मुले मिनाक्षी संजय पाथरवट (१३), तनिषा संजय पाथरवर (१२) उन्नती संजय पाथरवट (१०), गायत्री संजय पाथरवट (७), कार्तीक संजय पाथरवट (४) रा. लोणखेडा ता.शहादा यांच्यासह दि.६ ऑगस्ट रोजी कुठेतरी निघून गेली.बाबत तीचे सासरे अनिल अर्जुन पार्थवट रा. लोणखेडा अंबाजीनगर ता. शहादा यांनी खबर दिल्याने मिसिंग दाख़ल करण्यात आली होती.
महिलेसह ५ मुले मिसिंग झालेली असल्याने व दिड महिन्याचे वर कालावधी होऊन देखील काही ठाव ठिकाणा लागत नसल्याने सदर प्रकरणाचे संवेदनशिलता ओळखुन यात अनैतिक मानवी वाहतुकीचा प्रकार होऊ शकतो ही शक्यता लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील, यांनी सदर मिसिंग प्रकरणाचा तपास करण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना आदेशीत केले होते.
त्यानुसार पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी पोहवा प्रमोद सोनवणे, पोना विकास कापुरे, पुरुषोत्तम सोनार, पोकॉ यशोदिप ओगले यांचे पथक स्थापन करुन हरविलेल्या महिलेबाबत सदर महिला ही सध्या सुरत वेरली गावाजवळ जीआयडीसीमध्ये वास्तव्यास असल्याची खात्रीशिर माहीती काढली. मिळालेल्या माहितीवरुन पथकाने वेरली गावाजवळ जीआयडीसीमध्ये ५ किलोमिटर परिघातील महाराष्ट्रातील लोकांचे वस्त्यांमध्ये फिरुन महिला व मुलींचे फोटो दाखवुन महिला व मुलींचा शोध लावुन त्यांना नंदुरबार येथे आणले.
महिला आरती संजय पाथरवट हीस तिचे निघुन जाण्याचे कारणाविषयी विचारणा केली असता,पती दारुचे व्यसनाच्या आहारी गेला असुन कामधंदा न करता सतत भांडण करतो. कामधंदा नसल्याने मुलांवर उपासमार होण्याची वेळ आल्याने तीने सर्व मुलांसह कामधंद्यासाठी सुरत गाठल्याचे सांगितले. महिलेची परिस्थिती पहाता तिला सर्व मुलांचे संगोपन एकट्याने करणे जिकरीचे होणार असल्याने नंदुरबार जिल्हा पोलीस दलाचे मार्फतीने एनजीओंकडून मदत मिळुन मुलींचे शिक्षणासाठी मदत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
सदरची कामगिरी मा.पोलीस अधिक्षक पी.आर.पाटील, अपर पोलीस अधिक्षक -विजय पवार यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोहवा प्रमोद सोनवणे, पोना विकास कापुरे, पुरुषोत्तम सोनार, पोकॉ किरण मोरे, यशोदिप ओगले, मपोहवा विजया बोराडे यांचे पथकाने प्रकरणाची संवेदनशिलता ओळखुन तपास केल्याबद्दल पोलीस अधीक्षक, नंदुरबार पी.आर.पाटील यांनी संपुर्ण पथकाचे अभिनंदन केले आहे.