नंदुरबार l प्रतिनिधी
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार नंदुरबार जिल्हा परिषद व पंचायत समिती पोटनिवडणूकीसाठी 5 ऑक्टोबर, 2021 रोजी मतदान तर 6 ऑक्टोबर, 2021 रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषद व त्याअंतर्गत असलेल्या पंचायत समिती मतदार संघातील ज्या गावांना मतदान केंद्र आहेत त्याठिकाणी तसेच मतमोजणी केंद्राच्या परिसरात भरणारे आठवडे बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी मनीषा खत्री यांनी दिले आहेत.
या दिवशी भरविण्यात येणारे आठवडे बाजार अन्य दिवशी भरविण्यात यावे, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.