Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नामाकिंत निवासी शाळेतील पहिलीच्या प्रवेशासाठी ३ ऑक्टोंबर रोजी ईश्वरचिठ्ठीद्वारे निवड

team by team
September 26, 2023
in राज्य
0
नामाकिंत निवासी शाळेतील पहिलीच्या प्रवेशासाठी ३ ऑक्टोंबर रोजी ईश्वरचिठ्ठीद्वारे निवड
नंदुरबार l प्रतिनिधी
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, तळोदा अंतर्गत येणाच्या तळोदा, अक्कलकुवा व धडगांव या तीन तालुक्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना २०२३ २०२४ या शैक्षणिक वर्षांत नामांकित इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेत पहिलीच्या प्रवेशासाठी निवड ईश्वरचिठ्ठीद्वारे मंगळवार ३ ऑक्टोंबर २०२३ रोजी सकाळी ११ वाजता तळोदा प्रकल्प कार्यालय येथे होणार असल्याची माहिती सहाय्यक जिल्हाधिकारी मंदार पत्की यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेत पहिलीच्या प्रवेशासाठी ३७५ जागांसाठी लक्षांक प्राप्त झाला असून प्राप्त लक्षांकापैकी ७३ लाभार्थ्यांची निवड राखीव प्रवर्गातून थेट निवड होणार असून उर्वरित ३०२ जागांसाठी विद्यार्थ्यांची निवड ईश्वरचिठ्ठीद्वारे करण्यात येणार आहे.
धडगाव तालुक्यासाठी ८९, अक्कलकुवा १०९ तर तळोदा तालुक्यासाठी १०४ विद्यार्थ्यांची निवड ईश्वरचिठ्ठीद्वारे करण्यात येईल. ईश्वरचिठ्ठीद्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी ०४ ऑक्टोंबर ते १२ ऑक्टोंबर २०२३ दरम्यान आपले आदेश कार्यालयातून घेवून जावून ज्या शाळेत विद्यार्थ्यांची निवड झाली असेल त्या शाळेत प्रवेश घ्यावा. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना शाळा बदलून मिळणार नाही.
तालुकानिहाय ईश्वरचिठ्ठी निवड प्रक्रीयेची वेळ तळोदा तालुक्यासाठी सकाळी ११.०० ते १२.०० वाजता, अक्कलकुवा दुपारी १२.०० ते १.०० तर धडगांव तालुक्यासाठी दुपारी १.०० ते २.०० वाजेदरम्यान राहील. ईश्वरचिठ्ठीद्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यापैकी जे विद्यार्थी दिलेल्या मुदतीत प्रवेश निश्चित करणार नाही त्या जागेवर प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येईल. निवड झालेल्या विद्यार्थ्याच्या पालकांनी १२ ऑक्टोंबर २०२३ पर्यंत प्रवेशासंबंधी कार्यवाही करावी. निवड प्रक्रियेबाबत सर्वाधिकार प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, तळोदा यांनी राहील. असेही प्रकल्प अधिकारी श्री. पत्की यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

धनगर समाजातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Next Post

मंगळवार ३ ऑक्टोंबर रोजी होणार जिल्हास्तरीय लोकशाही दिन

Next Post
मंगळवार ३ ऑक्टोंबर रोजी होणार जिल्हास्तरीय लोकशाही दिन

मंगळवार ३ ऑक्टोंबर रोजी होणार जिल्हास्तरीय लोकशाही दिन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

June 28, 2026
३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

June 28, 2026
मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई;  गुन्हा दाखल

मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई; गुन्हा दाखल

June 28, 2026
नवापूर पोलिसांची कारवाई; ३५ लाखांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधी तंबाखू व कंटेनर जप्त

नवापूर पोलिसांची कारवाई; ३५ लाखांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधी तंबाखू व कंटेनर जप्त

June 28, 2026
कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add