नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्हा धनगर समाजाच्या वतीने चौंडी येथे सुरू असलेल्या आमरण उपोषणास पाठिंबा जाहीर करण्यात आला असून याबाबतचे निवेदन उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांना देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान असलेल्या चौंडी ता.जामखेड जि.अहमदनगर येथे यशवंत सेनेच्या वतीने घटनेनुसार धनगर समाजाला एस.टी.(अनुसूचित जमाती) आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी याकरिता 6 सप्टेंबर 2023 पासून तर आज पर्यंत सुरू असलेल्या आमरण उपोषणास नंदुरबार जिल्ह्यातील सर्व धनगर समाज बांधवांचा व संघटनांचा जाहीर पाठिंबा आहे. त्याबाबतचे निवेदन नंदुरबार जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षक यांना देण्यात आले.
यावेळी नंदुरबार जिल्हा धनगर समाज महासंघाचे अध्यक्ष आनंद कुवर,पावबा धनगर, रविंद्र पेंढारकर,अशोक आजगे, दत्तू सुळ ,सुगंधा पेंढारकर,प्रतिभा धनगर,मीना धनगर, भैय्या तेले,अनिल पगारे यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी व समाजबांधव उपस्थित होते.








