नंदुरबार l प्रतिनिधी
सार्वजनिक गणेश उत्सवामध्ये सर्व गणेश मंडळांनी एचआयव्ही/एड्स जनजागृतीसाठी 8 बाय 8 आकाराचे 2 बॅनर्स गणेश मंडळाच्या प्रदर्शनी भागात स्वखर्चाने लावावेत, असे आवाहन जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण समिती अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
याबाबत अधिक माहितीसाठी भ्रमणध्वनी क्रमांक 9822343863 व 9421480675 यावर संपर्क साधावा असेही श्रीमती खत्री यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.