नंदुरबार l प्रतिनिधी
स्वच्छता ही सेवा २०२३ या अभियान कालावधीत ग्रामस्थांनी श्रमदानातून गावातील पर्यटन स्थळे, तिर्थस्थळे, बाजार स्थळे, शाळा, आंगणवाडी, ग्रामपंचायत कार्यालय या सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता करून आपले गाव कचरामुक्त करावे .यासाठी गावातील सर्व पदाधिकारी ,शासकीय कर्मचारी व ग्रामस्थ यांनी अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित यांनी केले.
नंदुरबार जिल्हा परिषदेमध्ये आयोजित जलव्यवस्थापन समितीच्या बैठकीप्रसंगी आयोजित स्वच्छता शपथ कार्यक्रमप्रसंगी जि.प .अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित बोलत होत्या .यावेळी जि.प .उपाध्यक्ष सुहास नाईक ,मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार , अर्थ व शिक्षण समिती सभापती गणेश पराडके, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार पवार आदी उपस्थित होते .
यावेळी प्रकल्प संचालक जलजीवन मिशन एम. डी .धस यांनी प्रास्ताविक करून स्वच्छतेची शपथ दिली . यावेळी अध्यक्षा डॉ. गावीत यांनी दि. १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान सुरु असलेले स्वच्छता ही सेवा अभियान प्रत्येक गावात प्रभावीपणे राबविण्याबाबत निर्देश दिले .
यावर्षी कचरा मुक्त भारत ही अभियानाची थीम असून गावस्तरावरिल सर्व सन्मा सरपंच यांनी हे ग्रामस्थ व गावातील पदाधिकारी व कर्मचारी यांचे मदतीने अभियान राबविल्यास आपले गाव स्वच्छ होऊन कचरा मुक्त भारत चे स्वप्न सत्यात उतरेल गाव स्वच्छ झाल्यास गावात दृश्यमान स्वच्छता दिसेल व गावे रोगराई मुक्त होतील यासाठी सर्वांनी या अभियानात सहभागी व्हावे असे आवाहन डॉ सुप्रिया गावित यांनी यावेळी केले यावेळी सर्व कर्मचारी उपस्थित होते .