नंदूरबार l प्रतिनिधी
काकेश्वर विद्या प्रसारक संस्था भालेर संचलित. श्रीमती क.पु. पाटील माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात जागतिक ओझोन दिन साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे उपाध्यक्ष चंद्रशेखर भास्करराव पाटील. प्रमुख पाहुणे विद्यालयाच्या प्राचार्या सौ. विद्या चव्हाण, पर्यवेक्षक अनिल कुवर होते. कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन ए.एस. पाटील विज्ञान शिक्षक यांनी केले. विद्यार्थ्यांनी ओझोन थराविषयी मराठी, इंग्रजी भाषेमध्ये आपल्या मनोगताद्वारे विद्यार्थ्यांना, ओझोन थराचे महत्व, ओझोन थराच्या संरक्षणाविषयी माहिती करून दिली.
तसेच शिक्षकांनी ओझोन दिना विषयी सखोल अशी माहिती दिली. पर्यवेक्षक यांनी मनोगत व्यक्त केले. पल्लवी चंद्रकांत पाटील इयत्ता दहावीची विद्यार्थिनीने सूत्रसंचालन केले,ए.एस. पाटील विज्ञान शिक्षक यांनी आभार प्रदर्शन केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयाचे प्राध्यापक ,शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.