नंदुरबार l प्रतिनिधी
शहरातील साक्रि रस्त्यावरील जिल्हा रुग्णालयापुढील आनंदी माता मंदिरासमोरील टेकडीवर असलेल्या बेलेश्वर महादेव मंदिरात अखंड रामधूनची वृक्षारोपणाने समाप्ती झाली.
रामनामाचे प्रखर प्रसारक संत श्री दगाजी बापू यांच्या कृपाआशीर्वादाने संत श्री मनीलाल बापू महाराज यांच्या दिव्य प्रेरणेने संपूर्ण श्रावण महिन्यात निसर्गरम्य परिसर असलेल्या बेलेश्वर महादेव मंदिरात अखंड रामधूनचे आयोजन करण्यात आले होते.संतश्री आनंद महाराज, संतश्री निंब महाराज यांच्या उपस्थितीत बेलेश्वर महादेव मंदिराच्या टेकडीवर विविध प्रकारची रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले.
बेलेश्वर महादेव येथे घोघळपाडा,चिखलपाडा, नांदरखेडे, व परीसरातील भाविकांचा प्रतिसाद मिळाला.याचबरोबर अखंड रामधुन समाप्ती निमित्त बालकृष्णांच्या हस्ते दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. महिला,पुरूष भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.अखंड रामधुन यशस्वीतेसाठी बेलेश्वर महादेव मंदिर शिवभक्तांनी परिश्रम घेतले.