नंदुरबार l प्रतिनिधी
छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) च्या वतीने वर्ष २०२२-२३ साठी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीमार्फत सारथीच्या लक्षीत गटातील उमेदवारांकरीता कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या माध्यमातून रोजगार व स्वयंरोजगार मिळावा यासाठी सामंजस्य करार करण्यात आलेला आहे. जास्तीत जास्त उमेदवारांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन नंदुरबारचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त विजय रिसे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
‘सारथी’ च्या लक्षीत गटातील मराठा, कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी मराठा या प्रवर्गाच्या उमेदवारांना कौशल्य प्रशिक्षणअंती रोजगारक्षम बनविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.
कौशल्य विकास सोसायटीच्या संकेतस्थळावर कौशल्य प्रशिक्षण व अभ्यासक्रम मागणी नोंदविण्याकरिता इच्छुक असणाऱ्या पात्र उमेदवारांनी https://kaushalya.mahaswayam.
या उमेदवारांना कौशल्य प्रशिक्षण देण्याकरिता नंदुरबार जिल्ह्यामधून स्किल इंडिया पोर्टलवरील विविध सेक्टरमधील अभ्यासक्रमाकरिता ५ स्टार, ४ स्टार व ३ स्टार ट्रेनिंग सेंटर (TP-TC) यांच्याद्वारे महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीमार्फत विहीत प्रक्रियेचा अवलंब करून प्रशिक्षण राबविले जाणार आहे.
अधिक माहितीसाठी उमेदवारांनी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, टोकर रोड, तळ मजला, कार्यालय नंबर २७, नंदुरबार येथे प्रत्यक्ष अथवा व दूरध्वनी क्रमांक ०२५६४-२९५८०१ यावर संपर्क साधावा, असेही आवाहन श्री. रिसे यांनी केले आहे.








