नंदूरबार प्रतिनिधी
श्रीमती क.पु. पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय भालेर ,माध्यमिक विद्यालय खोकराळे , यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीबाबत सविचार सभा शालेय संकुलात घेण्यात आली सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष भास्करराव हिरामण पाटील होते.
गुणवत्ता व विद्यालयात चालू असलेल्या विविध उपक्रमाचा आढावा घेण्यासाठी संस्थेचे कार्याध्यक्ष विजय बोरसे,उपाध्यक्ष चंद्रशेखर पाटील , प्राचार्या सौ. विद्या चव्हाण, मुख्याध्यापक एस. जी. सैंदाणे, पर्यवेक्षक अनिल कुवर उपस्थित होते.
प्राचार्य सौ. विद्या चव्हाण यांनी विद्यालयात घेतले जाणारे विविध उपक्रम व गुणवत्तावाढीसाठी काय केले जाते. यावर सविस्तर माहिती सांगितली.

विद्यालयातील शिक्षक, शिक्षिका यांनीही वैयक्तिक रित्या राबवण्यात येणाऱ्या उपक्रमाविषयी व गुणवत्तावाढी विषयी सर्व शिक्षक शिक्षिका यांनी आपण कोण कोणते तंत्र व शैक्षणिक साहित्य वापरतात तसेच अभ्यासात मागे असणारे विद्यार्थी व नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांना लिहिता वाचता येत नाही यासाठी कोणते तंत्र व शैक्षणिक साहित्याचा वापर केला तसेच विविध शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत आलेले विद्यार्थी व शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थी याविषयी सविस्तर माहिती दिली. विद्यार्थी गैरहजेरी कमी व्हावी. विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढावी यासाठी आपण काय प्रयत्न करता याविषयीआढावा घेतला.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, कार्याध्यक्ष, उपाध्यक्ष यांनी चर्चात्मक स्वरूपात गुणवत्ता वाढीसाठी तसेच विद्यार्थी गळती विषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. शिक्षकांनी बनवलेल्या शैक्षणिक साहित्याचा कार्यानुभव अंतर्गत बनवलेल्या मातीच्या वस्तू तसेच विद्यार्थ्यांना ङ्गङ्घकमवा व शिकाङ्घङ्घ या अंतर्गत टाकाऊ वस्तु पासून टिकाऊ वस्तू बनविणे , कार्यानुभव अंतर्गत पर्यावरण पूरक राख्या ,फ्लावर पॉट व इतर साहित्य पाहिल्यावर संस्थेने समाधान व्यक्त केले. दोन्ही शाखांच्या सर्वकर्मचाऱ्यांना मार्गदर्शक सूचना केल्या. विद्यालयाचे प्राचार्या सौ.विद्या चव्हाण यांनी आभार प्रदर्शन केले.सभेच्या आयोजन नियोजनासाठी सर्व कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले. सहविचार सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.








