Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तीन कोटींची वीज चोरी उघडकीस; भरारी पथकाची कारवाई

team by team
September 13, 2023
in क्राईम
0
तीन कोटींची वीज चोरी उघडकीस; भरारी पथकाची कारवाई

मुंबई प्रतिनिधी

 

मीटरमध्ये छेडछाड करून रिडींग रिव्हर्स करून तीन कोटी रुपयांची वीज चोरी करणाऱ्या उच्चदाब वीज ग्राहकावर महावितरणच्या भरारी पथकाने कारवाई केली असून हा वीज चोरीचा प्रकार पनवेल शहरात उघडकीस आला आहे.

 

 

पनवेल शहरातील भरारी पथकाच्या वतीने वीज ग्राहकांची तपासणी मोहीम सुरु असतांना बीएचरोड वरील दत्ता भोईर या उच्चदाब ग्राहकाच्या चिली हॉटेलची तपासणी केली असता भरारी पथकाला अनियमितता आढळून आली. या ग्राहकाने वीज मीटरमध्ये छेडछाड करून मीटरची रिडींग रिव्हर्स करून वीज चोरी केल्याचे आढळून आले. त्यामुळे विद्युत कायदा 2003 मधील कलम 135 मधील तरतुदीनुसार ग्राहकाने वीज चोरी केल्याचे स्पष्ट झाले. तपासणीत ही वीज चोरी सुमारे तीन कोटी रुपयांची असल्याचे आढळून आले. ग्राहकास वीज चोरी दंडाची रक्कम भरण्याचे आदेश देण्यात आले असून ही रक्कम न भरल्यास वीज कायद्यातील तरतुदीनुसार गुन्हा नोंदविण्यात येणार आहे.

 

 

महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी मोठया प्रमाणात वीजचोरी शोध मोहिम राबविण्याचे आदेश दिले आहे. सुरक्षा व अंमलबजावणी विभागाच्या कार्यकारी संचलिका स्वाती व्यवहारे व विभागाचे कोकण परिक्षेत्राचे उपसंचालक सुमित कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त कार्यकारी अभियंता बाकू रामदास मानवटकर, सहाय्यक अभियंता कुणाल पिंगळे, सहाय्यक सुरक्षा व अंमलबजावणी अधिकारी आकाश गौरकर व सुरक्षा व अंमलबजावणी विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही वीज चोरी विरुद्धची मोहीम यशस्वी केली.

बातमी शेअर करा
Previous Post

काकेश्वर विद्या प्रसारक संस्था भालेर संचलित सर्व शाखांची सहविचार सभा उत्साहात

Next Post

मराठा समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सक्रीय ‘सारथी’

Next Post
मराठा समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सक्रीय ‘सारथी’

मराठा समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सक्रीय ‘सारथी’

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

November 1, 2026
खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

November 1, 2026
सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

November 1, 2026
भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

November 1, 2026
सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

October 31, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्र्यंबकेश्वर  गोदाघाट येथे सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभाचे पूजन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्र्यंबकेश्वर गोदाघाट येथे सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभाचे पूजन

October 31, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add