Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शहाद्यात सहिष्णू जाती धर्माच्या लोकांची सलोखा समिती गठीत

team by team
September 13, 2023
in सामाजिक
0
शहाद्यात सहिष्णू जाती धर्माच्या लोकांची सलोखा समिती गठीत

शहादा प्रतिनिधी

 

येथील सावित्रीमाई फुले व महात्मा फुले यांच्या स्मारका जवळ लोकशाही जागर समितीच्या वतीने सलोखा समितीची बैठक आयोजित केली होती.या बैठकीत सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर सलोखा समिती स्थापन करण्यात आली आहे.

 

 

 

 

येणाऱ्या काळात शहादा शहरात गणेशोत्सव, नवरात्र, दसरा,दिवाळी असे सार्वजनिक आनंदाचे उत्सव येऊ घातले आहेत.त्या पार्श्वभूमीवर शहादा शहरात गणेशोत्सव मिरवणूकी दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये.व धर्माधर्मात द्व्‌ोषाचे व संशयाचे वातावरण तयार होऊन दंगलसदृश परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून लोकशाही जागर समितीच्या वतीने सलोखा समिती स्थापन करून शहाद्याच्या सर्व जातीधर्माच्या लोकांना या सणांचा निव्वळ आनंद उपभोगायचे आवाहन करण्यात येत आहे.सलोखा समिती या सण उत्सवात कार्यरत असणाऱ्या पोलिसांना मदत करणार आहे.जेथे जेथे ताणतणाव निर्माण होण्याची शक्यता असेल तेथे प्रेमपूर्वक व शांततेने उत्सव पार पडावा यासाठी प्रयत्न करणार आहे.

 

 

 

या अगोदर गणेश उत्सवा दरम्यान नंदुरबार जिल्ह्यातील शहादा व नंदुरबार येथे काही घटना घडल्या आहेत. त्या घटनांमुळे सर्व सामान्य माणसाच्या जगण्याची परवड झाल्याचेही दिसून आले आहे.असे अनुचित प्रकार घडू नये व सर्व सामान्य जनजीवन विस्कळित होऊ नये यासाठी शहादा शहरातील सहिष्णू व जागरूक नागरिकांनी ही सलोखा समिती गठीत केली आहे.

 

 

 

या सलोखा समितीचे सक्रीय सदस्य म्हणून पुष्पेंद्र सामुद्रे, शिवाजी महाले,गोटू धनगर, बलवंत देवरे,हाजी शाकीर खाटिक, तबरेजभाई पठाण, निजाम मिस्तरी, लक्ष्मण निकुंभे, रमेश बिरारे, किशोर मगरे, संतोष पवार, हिरालाल मुसळदे, राजकुमार पावरा,संजय अहिरे, राजेंद्र वाघ, नरेंद्र कुवर, आझाद माळी, मिलिंद माणिक,छोटू कुवर तराडीकर, सुरेश रेता मोरे, कृष्णा कोळी, संतोष कुवर,चेतन गांगुर्डे, ज्ञानेश्वर सोनवणे , रघुनाथ बळसाणे, सुभाष नागो भिल,दिलवरसिंग पाडवी, विश्वास जगदेव, प्रदीप केदारे, चंद्रसिंग बरडे, रंजनाताई कान्हेरे, चुनिलाल ब्राम्हणे , दादाभाई पिंपळे यांची ठरावाद्वारे नेमणूक करण्यात आली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार जिल्ह्याच्या याहा मोगी माता बियाणे संवर्धन समितीला राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्रदान

Next Post

काकेश्वर विद्या प्रसारक संस्था भालेर संचलित सर्व शाखांची सहविचार सभा उत्साहात

Next Post
काकेश्वर विद्या प्रसारक संस्था भालेर संचलित सर्व शाखांची सहविचार सभा उत्साहात

काकेश्वर विद्या प्रसारक संस्था भालेर संचलित सर्व शाखांची सहविचार सभा उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

गुजरातमधून एचटीबीटी बियाण्यांची महाराष्ट्रात प्रतीकात्मक एंट्री, सीमेवर शेकडो शेतकरी उपस्थित

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

June 12, 2026
शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

June 5, 2026
ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

June 5, 2026
शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

June 5, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add