Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

फटाके दुकान व परवान्यासाठी मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन

team by team
September 30, 2021
in आरोग्य
0
धार्मिक स्थळे आणि प्रार्थनास्थळे सुरू करण्यास परवानगी : जिल्हाधिकारी मनीषा खत्री
नंदुरबार l प्रतिनिधी
 दिवाळी सणासाठी तात्पुरत्या स्वरुपात फटाका विक्री व साठवणूक करणाऱ्या जिल्ह्यातील सर्व परवानाधारकांनी मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी केले आहे.
फटाके  विक्रींसाठी स्टॉलची संख्या एका ठिकाणी एकापेक्षा जास्त असल्यास दोन स्टॉल मधील अंतर 3 मीटर पेक्षा कमी नसावे, तसेच बाहेरील सुरक्षीत अंतर 50 मीटर असल्यास दोन स्टॉल मधील अंतर 3 मीटर पेक्षा कमी नसावे, बाहेरील सुरक्षीत अंतर 50 मीटर पर्यंतचे व अशी स्टॉल दोन किंवा दोनपेक्षा अधिक रांगेत असल्यास ती समोरासमोर 50 मीटर पेक्षा कमी अंतराची नसावी, प्रत्येक स्टॉलमधील वरील फटाक्याची एकूण परिमाणता 500  कि.ग्रामपेक्षा अधिक नसावी, प्रत्येक स्टॉलचे क्षेत्र 10-20 चौ.मीटर पर्यंतचे असावे.
फटाके विक्रींची जागेची निवड करतांना एक किंवा त्यापेक्षा अधिक समांतर रांगामधील स्टॉलचे दरवाजे समोरासमोर नसावेत, ते मागील बाजुने बंद असावेत. फटाका विक्री स्टॉलजवळ अग्निसुरक्षा व्यवस्था, आणि पाण्याचे साठे (टँकर ) ठेवणे आवश्यक असेल. स्टॅालमध्ये अग्नि उपद्रवास कारणीभुत ठरणाऱ्या वस्तू प्रतिबंधीत असेल. फटाका विक्री परिसरात दक्षता पथकाची गस्ती असावी. फटाका विक्री स्टॉलच्या परिसरात धुम्रपान प्रतिबंधीत राहील.
फटाका विक्री करताना फटाक्यासाठी 100 किलो ग्राम व शोभेचे झकाकणारे चायनिज फटाक्यासाठी 500 किलो ग्राम एवढा परिमाणापेक्षा जास्त परिमाण बाळगता येणार नाही. आपटून फुटणारे फटाक्यांना मान्यता नसल्याने अशा फटाक्यांच्या विक्रीस परवानगी असणार नाही. गाडीतुन किंवा फिरत्या वाहनातून फटाके विक्री करता येणार नाही.
पर्यावरण सुरक्षा नियमानुसार एखादा फटाका उडविण्याच्या जागेपासुन 4 मीटर अंतरापर्यंत 125 डेसीबल आवाज निर्माण करणाऱ्या  फटाक्यांच्या उत्पादन, विक्री व वापर यावर बंदी घालण्यात आली आहे. तर साखळी फटाक्यांत 50, 50 ते 100 व 100 त्यावरील फटाके असतील तर आवाजाची मर्यादा फटाका उडविण्याच्या जागेपासून 4 मीटर अंतरापर्यंत अनुक्रमे 115, 110 व 105 डेसीबल एवढी असावी. रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत दारुकाम व फटाक्याचा वापर करता येणार नाही.
रुग्णालये, शैक्षणिक संस्था, न्यायालये, धार्मिक प्रार्थनास्थळे यांच्या सभोवतालचे 100 मीटर पर्यंतचे क्षेत्रात शांतता प्रभागात फटाक्याचा वापर करता येणार नाही. फटाका विक्री परवाना दर्शनी भागावर लावणे   आवश्यक राहील. परवाना मिळाल्याखेरीज फटाका विक्री करणे अवैध राहील. परवान्याशिवाय फटाके विक्री करणाऱ्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
फटाका विक्री व साठवणुकीसाठीचा विहीत नमुन्यातील परवानगी अर्ज 1 ऑक्टोंबर ते 10 ऑक्टोंबर पर्यंत‍ वितरीत करण्यात येतील व अर्ज सादर करण्याची मुदत 15 ऑक्टोंबरपर्यंत राहील.  पोलीस विभागाने सादर अर्जावर अभिप्राय कळविण्याची अंतिम मुदत 20 ऑक्टोंबर असेल तर शिफारशी अंती मंजूर परवाने वितरण 21 ते 22 ऑक्टोंबर या कालावधीत राहील.
परवानाधारकांनी विस्फोटक नियम 2008 आणि 1884 तसेच विस्फोटक विभागाने वेळोवेळी जारी केलेल्या अटी व शर्तीचे पालन करणे आवश्यक राहील. कोरोना विषाणुचा प्रसार व प्रादुर्भाव विचारात घेता फटका स्टॉलच्या ठिकाणी सामाजिक अंतर ठेवणे, मास्क परिधान करणे, सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक असेल. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्वे, आदेश तसेच सुचनांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहील. सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

Next Post

कोपर्ली गटात रंगणार तिरंगी लढत

Next Post

कोपर्ली गटात रंगणार तिरंगी लढत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add