नंदुरबार l प्रतिनिधी
कोपर्ली गटात चार उमेदवारांनी माघार घेतल्याने येथे तिरंगी लढत रंगणार आहे .
कोपर्ली गटातील शिवसेना उमेदवाराच्या अर्जावर न्यायालयात हरकत घेण्यात आली होती . त्यामुळे येथे २९ सप्टेंबरपर्यंत माघारीची मुदत होती . बुधवारी शेवटच्या दिवशी चार उमेदवारांनी माघार घेतल्याने येथे तीन
उमेदवार रिंगणात आहेत . त्यात शिवसेनेतर्फे राम चंद्रकांत रघुवंशी , भाजपतर्फे पंकज प्रकाश गावित तर अपक्ष राहुल श्रीराम कुवर यांच्यात लढत रंगणार आहे .