Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

चालक परवान्यासाठी मासिक दौऱ्याचे आयोजन

Mahesh Patil by Mahesh Patil
September 30, 2021
in सामाजिक
0
आरटीओ बच्छाव यांनी आज पदभार सोडला,किरण बिडकर लवकरच स्वीकारणार पदभार
नंदुरबार l प्रतिनिधी
जिल्ह्यातील नागरिकांच्या वाहनांचे कच्चे व पक्के अनुज्ञप्ती कामकाजासाठी माहे ऑक्टोंबर, नोव्हेंबर तसेच डिसेंबर 2021 मध्ये तालुकास्तरावर मासिक दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
ऑक्टोंबर 2021 महिन्यात शहादा येथे मंगळवार 5,12 व 26 ऑक्टोंबर रोजी, नवापूर येथे बुधवार 6 व 20 ऑक्टोंबर, धडगाव 27 व 28 ऑक्टोंबर तर तळोदा येथे शुक्रवारी 8 व 22 ऑक्टोंबर रोजी मासिक दौरा आयोजित करण्यात आला आहे.
नोव्हेंबर महिन्यात शहादा येथे मंगळवार 2,9, 16 व 23 नोव्हेंबर रोजी, नवापूर येथे बुधवार 3 व 17 नोव्हेंबर, धडगाव 29 व 30 नोव्हेंबर तर तळोदा येथे शुक्रवारी 12 व 26 नोव्हेंबर रोजी दौरा असेल.
तर डिसेंबर  महिन्यामध्ये शहादा येथे मंगळवार 7,14, 21 व 28 डिसेंबर रोजी, नवापूर येथे बुधवार 8 व 22 डिसेंबर, धडगाव 29 व 30 डिसेंबर तर तळोदा येथे शुक्रवार 3 व 17 डिसेंबर रोजी मासिक दौरा राहील.
कच्ची व पक्क्या अनुज्ञप्तीची चाचणी ही त्या तालुक्यातील लोकांसाठी निश्चित केलेल्या संख्येप्रमाणे घेण्यात येणार आहे. यावेळी अपूर्ण अर्ज स्विकारण्यात येणार नाही. ऐनवेळी एखाद्या तारखेस सुट्टी जाहीर झाल्यास सदर दौरा दुसऱ्या दिवशी घेण्यात येईल. कोरोना विषाणु प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर चाचणी वेळी मास्क लावणे, सामाजिक अंतराचे पालन तसेच सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक असेल.
तरी सर्व मोटार वाहन मालक, चालक व अनुज्ञप्ती धारकांनी कच्ची व पक्की अनुज्ञप्तीसाठी ऑनलाईन वेळ घेऊन मासिक दौऱ्याच्या ठिकाणी कार्यालयीन वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन  उप प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बिडकर यांनी केले आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

धार्मिक स्थळे आणि प्रार्थनास्थळे सुरू करण्यास परवानगी : जिल्हाधिकारी मनीषा खत्री

Next Post

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

Next Post

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबारात विठू माऊलीची भव्य १२ फुटांचा मूर्तीचे आषाढी एकादशीला लोकार्पण,5 जुलैला टाळ मृदुंगाच्या गजरात सवाद्य मिरवणूक

नंदुरबारात विठू माऊलीची भव्य १२ फुटांचा मूर्तीचे आषाढी एकादशीला लोकार्पण,5 जुलैला टाळ मृदुंगाच्या गजरात सवाद्य मिरवणूक

June 30, 2025
डॉ. हिना गावित यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित जम्बो कला-क्रीडा स्पर्धा ठरल्या प्रेरणादायी

डॉ. हिना गावित यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित जम्बो कला-क्रीडा स्पर्धा ठरल्या प्रेरणादायी

June 30, 2025
शेतकऱ्यांसाठी सौर पंप अर्ज करण्यापासून ते लाभ मिळवण्यापर्यंतची संपूर्ण माहिती जाणून घ्या

शेतकऱ्यांसाठी सौर पंप अर्ज करण्यापासून ते लाभ मिळवण्यापर्यंतची संपूर्ण माहिती जाणून घ्या

June 30, 2025
तळोद्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

तळोद्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

June 28, 2025
खा. सुनिल तटकरे यांच्या दौऱ्यानिमित्त नवापूर येथे राष्ट्रवादीची बैठक

खा. सुनिल तटकरे यांच्या दौऱ्यानिमित्त नवापूर येथे राष्ट्रवादीची बैठक

June 28, 2025
के.डी.गावीत सैनिकी विद्यालयात छत्रपती शाहूमहाराज जयंती उत्साहात साजरी

के.डी.गावीत सैनिकी विद्यालयात छत्रपती शाहूमहाराज जयंती उत्साहात साजरी

June 28, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group