नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्हा दुष्काळी जाहीर करा अशा मागणीचे निवेदन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे तहसीलदार नितीन गजरे यांना देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, यंदा सप्टेंबर महिना येऊन ठेपला आहे पावसाळा ऋतू संपन्यात आला आहे तरी देखील राज्यात अद्याप पावतो समाधानकारक पाऊस झालेला नाही .राज्यात कोकण वगळता राज्यातील उर्वरित भागात सरासरी पेक्षा कमी पाऊस झाल्याने कापूस ,मका, सोयाबीन, कांदा ,बाजरी ,भुईमूग, उडीद, चवळी ,मिरची ,फळभाज्या असे अनेक पिकं करपू लागले आहेत .
आता जमिनीतील पाण्याची पातळी देखील खालावत आहे त्यातच वीज वितरण कंपनीने भारनियमन सुरू केल्याने बळीराजा देशोधडीला लागला आहे. कुंपणनलिकेत, विहिरीत असलेल्या पाण्याने शेतातील पिके वाचवण्याच्या प्रयत्न शेतकरी करीत आहेत मात्र पुरेसा वीज पुरवठा होत नसल्याने थोडेफार पाणी असून देखील विजेअभावी शेतीस पाणी देता येत नाही त्यामुळे हातातील पिके नष्ट होताना दिसत आहेत. सरासरी पर्जन्यमान अभावी व भार नियमानामुळे राज्यातील शेतकरी हवालदील झाला असून अडचणीत सापडला आहे. त्यामुळे राज्य शासनाने राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून तातडीने शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घ्यावा ,
पीक कर्ज माफ करावी तसेच चालू शैक्षणिक वर्षात राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या मुला मुलींचे शिक्षण व परीक्षा फी माफ करावी अशी मागणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष नंदुरबार तालुक्याच्या वतीने करण्यात आली आहे . या मागणीचे निवेदन
आज तहसीलदार नितीन गजरे यांना देण्यात आले .यावेळी तालुका काँग्रेस अध्यक्ष विश्वनाथ वळवी, युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष पंडित तडवी ,दत्तू पवार ,रउफभाई शहा, इकबाल सुलेमान खाटीक, अमीर खान पठाण ,मुन्ना वसावे ,भास्कर पाटील, आर पी आय चे जिल्हा युवक अध्यक्ष संजू सोनवणे, आप्पा वाघ आदी उपस्थित होते.








