Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

वनपट्टेधारकांचे जीवनमान उंचावण्यासाठी शाश्वत शेती विकासाच्या योजनांची निर्मिती : पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

team by team
September 4, 2023
in राजकीय
0
वनपट्टेधारकांचे जीवनमान उंचावण्यासाठी शाश्वत शेती विकासाच्या  योजनांची निर्मिती : पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

नंदुरबार l प्रतिनिधी

आदिवासी विकास विभागामार्फत आदिवासी समुदायाच्या विकासासाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात, तसेच आदिवासी जमातीतील वनपट्टेधारक शेतकऱ्यांना सिंचनाच्या सुविधा पुरवुन शाश्वत शेती विकासासाठी प्रोत्साहन देणे व त्या माध्यमातून त्यांचे जीवनमान उंचावणे हे विभागाचे ध्येय असल्याचे प्रतिपादन आज राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले आहे.

 

 

ते आज नवापूर येथे आदिवासी बांधवांसाठी आयोजित वनपट्टे वाटपाच्या कार्याक्रमात बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भरत गावित, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती संगिता गावित, तहसिलदार महेश पावर, महसूल, ग्रामविकास, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी व पंचक्रोशीतील पदाधिकारी उपस्थित होते.

 

 

यावेळी बोलताना पालकमंत्री डॉ. गावित म्हणाले, अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासींसाठी वन हक्क मान्यतेच्या कायद्यानुसार अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी यांना वैयक्तिक व सामुहिक वनहक्क किंवा दोघांचे धारणाधिकार मिळण्याचे अधिकार प्राप्त झालेले आहेत. त्यामध्ये अनुसूचित जमाती आणि इतर पारंपरिक वन निवासी यांना स्वत:च्या उपजीविकेकरीता शेती कसण्यासाठी वन जमिनी धारण करण्याचा व त्यामध्ये राहण्याचा हक्क, निस्तार सारखे हक्क, गावाच्या सीमांतर्गत किंवा सीमेबाहेर पारंपारिकरित्या गोळा केले जाणारे गौण वनोत्पादन गोळा करणे, त्याचा वापर करणे किंवा त्याची विल्हेवाट लावणे यासाठी स्वामित्व हक्क, पाण्यामधील मत्स्य व अन्य उत्पादन, चराई करणे, पारंपारिक मोसमी साधन संपत्ती करण्यात आलेल्या कोणत्याही सामाजिक वनस्त्रोताचे संरक्षण, पुनर्निमाण, संवर्धन, व्यवस्थापन करण्याचे हक्क यासरखे वनहक्क प्राप्त झाले आहेत.

 

 

ते पुढे म्हणाले, वनहक्क काद्यातील तरतूदीनुसार संबंधित वनपट्टेधारकाने जैवविविधता राखणे आवश्यक आहे. त्यासाठीही कार्यवाही करणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे ज्यांना वनपट्टे वाटप करण्यात आले आहेत, त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी, त्यांना सौरपंप, फळबाग लागवड, शेततळे, अवजारे वाटप, कुक्कुटपालन, शेळीपालन व त्यांना आवश्यक असणारे सर्व प्रकारचे दाखले वाटप करण्यासाठी सर्व वनपट्टेधारकांचे वस्तुनिष्ठ सर्वेक्षण करणे व त्यासाठी संपूर्ण सेवा अभियान राबविण्यात येत आहे. आदिवासी भागात वनसंपत्ती विपुल प्रमाणात आहेत. उपलब्ध वनसंपत्तीचा वापर करून प्रक्रिया उद्योगासाठी अनेक महिला बचतगट, उद्योग संस्था पुढे येत आहेत. शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळामार्फत या प्रक्रिया उद्योगांसाठी आदिवासी उद्योजकांना आवश्यक आर्थिक पाठबळ उपलब्ध करून दिले जाणार आहे.

 

 

आदिवासी बांधवांना उद्योजकतेच्या प्रशिक्षणातून व्यवसाय उपलब्ध करून त्यांना आर्थिक सक्षम कसे करता येईल यादृष्टीने शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ कार्यरत आहे. येणाऱ्या काळात आदिवासी बांधवांनी प्रक्रिया उद्योगातून तयार केलेल्या उत्पादनाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी मंत्री डॉ. गिनीत यावेळी सांगितले.

 

लाभ आणि लाभार्थी

यावेळी ९६ गावातील विविध योजनांच्या लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला. तो असा…
* वनपट्टे उतारे वितरण २९५*
* पोटखराब उतारे वितरण ४०२*
* संजय गांधी निराधार योजना १०२*
*रेशनकार्ड ५८*

बातमी शेअर करा
Previous Post

जिल्हयात पावसासाठी जि. प.अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित यांचे महादेवाला साकडे

Next Post

नंदुरबार जिल्हा दुष्काळी जाहीर करा, काँग्रेसची मागणी

Next Post
नंदुरबार जिल्हा दुष्काळी जाहीर करा, काँग्रेसची मागणी

नंदुरबार जिल्हा दुष्काळी जाहीर करा, काँग्रेसची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add