नंदूरबार l प्रतिनिधी
गुजरात राज्यातील सुप्रसिद्ध असलेल्या धारेश्वर महादेवाचे मंदिराला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित यांनी दर्शन घेत दूध अभिषेक केला.नंदूरबार जिल्ह्यात पावसाची परिस्थिती बिकट झाली असून महादेवाकडे लवकर पाऊस येऊ दे असे साकडे घातले.
नंदुरबार जिल्ह्यात तीन महिने झाले असेल तरी समाधानकारकाचा पाऊस झालेला नाही आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठ संकट येत आहे. हे सर्व संकट लवकरच दूर होऊ दे आणि जिल्ह्यात भरभरून असा पाऊस येऊ दे शेतकऱ्यांना आणि पिण्याच्या पाण्याचे प्रश्न सुटेल अशी प्रार्थना गुजरात राज्यातील सुप्रसिद्ध असलेल्या धारेश्वर महादेवाला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित यांनी केली.








