Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पोलीस अधिकारी यांचे अनोखे रक्षाबंधन

team by team
August 30, 2023
in राजकीय
0
पोलीस अधिकारी यांचे अनोखे रक्षाबंधन
नंदूरबार l प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य महिला आयोगातर्फे पोलीस अधिकारी यांचे अनोखे रक्षाबंधन साजरे करण्यात आले.
नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने केलेल्या कामगिरीनिमित्त व मागील महिन्यात सोनसाखळी (चैन स्नॅचिंग) चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीतांना अटक करुन त्यांच्या ताब्यातून माता-भगिनींचे सौभाग्याचे लेणे अर्थातच मंगळसूत्र चोरणाऱ्या टोळीकडून हस्तगत केल्यामुळे कृतज्ञता म्हणून यंदाचा रक्षाबंधनाचा सण पोलीसांसोबत साजरा करावा असे आवाहन महाराष्ट्र राज्याच्या महिला आयोगाचे अध्यक्ष श्रीमती रुपाली चाकणकर यांनी जिल्हा महिला आघाडीच्या कार्यकत्यांना केले होते.
त्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा महिला आघाडीचे अध्यक्ष श्रीमती सीमा सोनगरे व पदाधिकारी यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात एक छोटेखानी पण दिमाखदार असा रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित करुन उपस्थित सर्व महिला भगिनींनी जिल्हा पोलीस दलातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना राखी बांधून रक्षाबंधनाचा सण साजरा केला. या कार्यक्रमाला उपस्थित पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी समाजातील सर्व माता-भगिनींच्या संरक्षाणासाठी सदैव तत्पर राहू असे वचन दिले.
यावेळी पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी  सांगितले की, कोणताही सण असो पोलीसांना कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यासाठी नेहमी कर्तव्यावर हजर राहावे लागत असते, त्यामुळे त्यांना त्यांच्या परिवारासोबत कुठलाच सण साजरा करता येत नाही अशावेळी रक्षाबंधणाचा सण एवढ्या उत्साहात साजरा केला त्याबद्दल त्यांनी महाराष्ट्र राज्याच्या महिला आयोगाचे अध्यक्ष श्रीमती रुपाली चाकणकर व जिल्हा महिला आघाडीचे आभार व्यक्त केले.
तसेच जिल्हा महिला आघाडीचे अध्यक्ष श्रीमती सीमा सोनगरे यांनी सांगितले की, नंदुरबार जिल्हा पोलीस दल फक्त रक्षाबंधनाच्या सणानिमित्तच नाही तर समाजातील सर्व माता भगिनी यांच्या सरंक्षणासाठी सदैव तत्पर आहे. मागील महिन्यात नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने उत्कृष्ट कामगिरी करुन सोनसाखळी (चैन स्नॅचिंग) चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीतांना अटक करुन त्यांच्या ताब्यातून माता-भगिनींचे सौभाग्याचे लेणे अर्थातच मंगळसूत्र चोरणाऱ्या टोळीकडून हस्तगत करुन यापूर्वीच त्यांना परत दिलेले आहे. त्यामुळे पोलीसांसोबत रक्षाबंधनाचा सण साजरा करीत असतांना त्यांना मनस्वी आनंद झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
मंगळसूत्र हे स्त्रीच्या भावनांशी निगडीत असते, त्यामुळे कोणी अज्ञात चोरटा ते तिच्याकडून हिसकावून नेतो तेव्हा तिला प्रचंड मानसिक त्रास होतो. भारतीय संस्कृतीमध्ये स्त्री मंगळसूत्रला सौभाग्यच प्रतीक समजते, म्हणून मंगळसूत्र स्त्रीयांसाठी खूप महत्वाचा दागिना असतो. परंतु नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने उत्कृष्ट कामगिरी करुन रक्षाबंधनाच्या अगोदरच सौभाग्याचे प्रतिक परत करुन एकाप्रकारे रक्षाबंधनाची भेटच दिली.
यावेळी पोलीस अधीक्षक  पी. आर. पाटील, पोलीस उप अधीक्षक (मुख्यालय) विश्वास वळवी, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी  संजय महाजन, शहादा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार, अक्कलकुवा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय वसावे, नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक  ज्ञानेश्वर वारे, शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत, धडगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक इशामोद्दीन पठाण,
अक्कलकुवा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत, सारंगखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक  कैलास वाघ, विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक  प्रकाश वानखेडे, म्हसावद पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक  राजन मोरे, मोलगी पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक राजेश गावीत, तळोदा पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक अमितकुमार बागुल, महिला सहाय्य कक्षाचे सहा. पोलीस निरीक्षक श्रीमती नयना देवेरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा महिला आघाडीचे अध्यक्ष  सीमा सोनगरे, जिल्हा सरचिटणीस  उषा वळवी, जिल्हा उपाध्यक्ष श्रीमती रचना परदेशी, जिल्हा चिटणीस सोनल चव्हाण, सचिव  सीमा पाडवी, सदस्य कांचन मोरे, चेतना भामरे,  श्रेया सोनगरे आदी उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

स्पर्धा परीक्षेत यश मिळविलेल्या यशवंतांचा सत्कार

Next Post

नंदुरबार तालुका दुष्काळ  जाहीर करा ; शिवसेनेचे जिल्हा प्रशासनाला निवेदन

Next Post
नंदुरबार तालुका दुष्काळ  जाहीर करा ; शिवसेनेचे जिल्हा प्रशासनाला निवेदन

नंदुरबार तालुका दुष्काळ  जाहीर करा ; शिवसेनेचे जिल्हा प्रशासनाला निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026
अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add