Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

स्पर्धा परीक्षेत यश मिळविलेल्या यशवंतांचा सत्कार

team by team
August 29, 2023
in राज्य
0
स्पर्धा परीक्षेत यश मिळविलेल्या यशवंतांचा सत्कार

म्हसावद । प्रतिनिधी

महाराष्ट्र लोकसेवा आयोग या स्पर्धा परीक्षेत यश संपादन केलेल्या वकिलांचा सत्कार समारंभ अक्कलकुवा व धडगाव वकिल संघाचे पदाधिकारी यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम तालुक्यातील डाब देवगोई याहा मोगी माता मंदिर परिसरात आयोजित करण्यात आला होता.

 

 

कार्यक्रमाच्या सुरुवातीला याहा मोगी मातेच्या मंदिरात जाऊन पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अ‍ॅड.रुपसिंग वसावे यांनी केले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड.एन.एस.शेख हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड.राजेंद्र इंदिस,अ‍ॅड.जगदीश कुवर, अ‍ॅड.आर.आर.मराठे,अ‍ॅड.सचिन राणे, अ‍ॅड.रवींद्र वसावे, अ‍ॅड.संग्राम पाडवी, अ‍ॅड.बापु पावरा हे उपस्थित होते.

 

 

यावेळी मान्यवरांच्या हस्ते सहाय्यक अभियोक्ता म्हणून निवड झालेल्या अ‍ॅड.ईश्वर वळवी, अ‍ॅड.रोहिदास पाडवी, अ‍ॅड.पी.आर.ठाकरे,अ‍ॅड.गोमता पावरा, अ‍ॅड.दिलीप वळवी,अ‍ॅड.चेतन वळवी, अ‍ॅड.कुवरसिंग वळवी, अ‍ॅड.वनिता वळवी, अ‍ॅड.लक्ष्मी पावरा आदींचा सत्कार करण्यात आला. यावेळी अ‍ॅड.राजेंद्र इंदिस , अ‍ॅड.जगदीश कुवर ,अ‍ॅड.आर.आर.मराठे, अ‍ॅड.सचिन राणे,अ‍ॅड.संग्राम पाडवी अ‍ॅड.वसंत वळवी, यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

 

 

ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. एन. एस.शेख यांनी अध्यक्षीय मनोगतात सांगितले की, “गरीबी यशाच्या आड येत नाही.फक्त सतत अभ्यास, प्रामाणिकपणा आणि विनम्रता अंगी बाळगून जिद्दीने परिस्थितीला अनुकूल करण्यासाठी कठोर परिश्रम घेतले पाहिजे. तेव्हा निश्चिंत यश मिळते.” यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अ‍ॅड.गजमल वसावे यांनी केले तर आभार अ‍ॅड. छोटू वळवी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अक्कलकुवा व धडगाव वकील संघाचे पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने वकील व परिसरातील नागरीक उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

व्हाईस ऑफ मीडियातर्फे विविध मागण्यांसाठी तहसीलदारांना दिले निवेदन

Next Post

पोलीस अधिकारी यांचे अनोखे रक्षाबंधन

Next Post
पोलीस अधिकारी यांचे अनोखे रक्षाबंधन

पोलीस अधिकारी यांचे अनोखे रक्षाबंधन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदरखे येथे प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत आषाढी एकादशी उत्साहात

नांदरखे येथे प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत आषाढी एकादशी उत्साहात

July 27, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना: जिल्ह्यातील 3 हजार 444 शेतकऱ्यांची पहिली यादी प्रसिद्ध

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना: जिल्ह्यातील 3 हजार 444 शेतकऱ्यांची पहिली यादी प्रसिद्ध

July 27, 2026
शिवदर्शन विद्यालयात अंधश्रद्धा निर्मूलन जनजागृती शिबिर

शिवदर्शन विद्यालयात अंधश्रद्धा निर्मूलन जनजागृती शिबिर

July 27, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात लोकमान्य टिळक जयंती उत्साहात साजरी

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात लोकमान्य टिळक जयंती उत्साहात साजरी

July 27, 2026
आषाढी एकादशी निमित्त वारकरी संस्कृतीचा अनोखा जागर

आषाढी एकादशी निमित्त वारकरी संस्कृतीचा अनोखा जागर

July 27, 2026
सैनिकी विद्यालयात कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा

सैनिकी विद्यालयात कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा

July 27, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add