नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथील मराठा गल्ली, भोई गल्ली, पाटील गल्ली, चैतन्य चौक, मंगळ बाजार परिसरातील गटारी व नाल्यांची साफसफाई होत नाही, परिसरातील रस्त्यांवरील सांडपाणी व तुंबलेल्या गटारीचे पाण्याचा बंदोबस्त करण्यात यावा, नळात गढूळ पाणी पुरवठा होत असल्याने वारंवार रस्ते खोदले जातात आणि त्या रस्त्यांचे दुरूस्तीकरण होत या परिसरातील नागरीक विविध समस्यांनी त्रस्त झाले असून नगरपालिका प्रशासनाविरोधात त्यांच्याकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. तरी या प्रकरणी नगर पालिका प्रशासनाने लक्ष लवकरात लवकर या समस्या सोडविण्यात याव्यात, अन्यथा परिसरातील नागरिकांकडून नंदुरबार पालिकेविरुद्ध तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. तसे निवेदन पालिकेचे मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे यांना देण्यात आले.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, चैतन्य चौक, पाटील गल्ली, भोई गल्ली, मराठा गल्ली पर्यंतच्या भागात सांडपाणी व गटार व्यवस्थापनाचा अक्षरश: बोजवारा उडालेला असून परिसरातील नागरिक या सर्व समस्यांमुळे जीव मुठीत घेवुन वास्तव्य करीत आहेत. गेल्या अनेक दशकांपासून या परिसरातील गटार व ड्रेनेज लाईन बदलेली नाही. परिणामत: त्या लाईनवर अतिरिक्त प्रेशर असल्याने वारंवार फुटते, पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन देखील तेथुनच गेलेली असून ड्रेनेजचे पाणी देखील रस्त्यावरुन वाहत असते. पिण्याच्या पाण्यात सुद्धा ते पाणी जात असल्यामुळे घरबसल्या आजार येत आहेत. घाण पाण्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येवुन आम्हाला डेंग्यु, मलेरिया, टायफाईड, साथीचे रोग आदींसारख्या गंभीर आजारांना तोंड द्यावे लागत आहे. यामुळे काही वेळा मृत्यूला देखील सामोरे जावे लागत आहे. तात्पुरते उपाय करणसाठी रस्ते खोदले जातात, परंतु नंतर त्यात फक्त माती टाकली जाते. त्यामुळे रस्त्याच अस्तित्व कुठेही बघायला मिळत नाही, सदर परिसरात न.पा.सफाई कर्मचारी देखील आठवड्यातुन एकदाच येतात. या सर्व बाबी स्थानिक नगरसेवक, मुकादम, न.पा.सफाई कर्मचारी यांना सांगुनही ते दुर्लक्ष करतात आणि कुठलाही निर्णय घेत नाहीत. तरी सदर प्रकरणात लक्ष घालुन सदर काम लवकरात लवकर पूर्ण करावेत, अन्यथा या परिसरातील नागरिकांकडून पालिकेविरुद्ध तिव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदनावर परिसरातील राहुल मराठे, पवन राजपूत, दर्शन पाटील, अनिल तांबोळी, कांतीलाल पाटील, हेमंत राजपूत, एकनाथ राजपूत, दिपक सुतारे, सचिन पाटील, मनिषा तांबोळी, सुनिता तांबोळी, प्रा.प्रकाश चौधरी, अथर्व चौधरी, अरुणाबाई पाटील, सारंग पाटील, मदन पाटील, भरत कासार, सुभाष जोहरी, उषा वाडीले, विनय वाडीले, राजेश भोई, भारती शिवदे, सदाशिव खेडकर, राधा वाडीले, साहेबराव शिवदे, शुभांगी साळी, नंदीनी वाडीले, कल्पना वाडेकर, संगिता साठे, आशा मोरे, कांतीलाल मोहिते, सचिन दाणेज, प्रशांत चौधरी, भानुदास बोरसे, सचिन मराठे, डॉ.विलास दाणेज, चंद्रभान साठे, उमेश सोनार, सौरभ कानोसे, कृष्णा मराठे, पप्पु मराठे, ऍड.देवेंद्र मराठे, गणेश कानोसे, चेतन वाडेकर, पवन बागूल, गोपाळ साळुंके, सागर सोनार सुमारे दिडशे जणांच्या सह्या आहेत.