नंदुरबार l प्रतिनिधी
उत्तर मध्य महाराष्ट्रात 30 सप्टेंबर 2021 पर्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असल्याने आज लघु पाटबंधारे योजना सुसरी प्रकल्पातुन 1 हजार 875 क्युसेक पाण्याचा विसर्ग गोमाई नदीपात्रात सोडण्यात आल्याने टेंभली, लोणखेडा, मलोणी, उंटावद, तिखोरा, शहादा, पिंगाणे, धुरखेडा, मनरद, करझई, डामरखेडा व लांबोरा नदीकाठच्या गावातील तसेच आसपासच्या गावांच्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी. गावातील नागरिकांनी नदीपात्रामध्ये आपली गुरेढोरे सोडू नये अथवा नदी पात्रामध्ये जाऊ नये. असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सुधीर खांदे यांनी केले आहे.