अक्कलकुवा | प्रतिनिधी
अक्कलकुवा ग्रामपंचायतीत झालेल्या कथित चार कोटी ७५ लाख रूपयांच्या गैरव्यवहार चौकशीअंती नंदुरबार जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी भ्रष्टाचारात दोषी असलेल्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्या आदेशास ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी स्गिती दिली होती. मात्र काल मंत्रालयात झालेल्या बैठकीला सदरची स्थगिती उठविण्यात आल्याने दोषींवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.
अक्कलकुवा ग्रामपंचायतीत सन २०१६ ते २०२० या कालावधीमध्ये कोटयावधी रूपयांचा भ्रष्टाचार झाल्याची तक्रार करण्यात आली होती. या तक्रारींची नंदुरबार जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी नेमलेल्या चौकशी समितीकडून चौकशी करण्यात आली. या भ्रष्टाचारात दोषी असलेल्या तत्कालीन सरपंच, प्रशासक, ग्रामविकास अधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुख्यकार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिले होते. यानिर्णयाला आव्हान देत संबंधितांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे धाव घेत गुन्हे दाखलच्या आदेशाला स्थगिती मिळविली होती. परंतु अक्कलकुवा ग्रामपंचायतील भ्रष्टाचाराबाबत काल दि.२९ जून रोजी ग्रामविकास मंत्रालयात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सुनावणीचे आदेश दिले होते. त्यानुसार सुनावणी झाली. सुनावणीत अक्कलकुवा ग्रामपंचायतीत झालेल्या भ्रष्टाचारातील सहभागतील असलेलयांवर गुन्हे दाखल करण्यास दिलेली स्थगिती उठविल्यामुळे आली आहे. या भ्रष्टाचारातील सहभागी व्यक्तींवर गुन्हे दाखलची टांगती तलवार आहे. या सुनावणीवेळी नंदुरबार जि.प. ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत शेखर रौंदळ, विस्तार अधिकारी बिराडे यांच्यासह अक्कलकुवा ग्रा.पं.चे उपसरपंच ताजमोहम्मद मकरानी उपसित होते. या सुनावणीला ग्रामपंचायतीच्या सरपंचा राजेश्वरी वळवी यांनी उपस्थित राहण्योच आदेश असतांनाही त्या उपस्थित राहिल्या नसल्याचे सुत्रांनी सांगितले.