Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अक्कलकुवा ग्रामपंचायतीतील गैरव्यवहार बाबत गुन्हे दाखल करण्याचे आदेश

team by team
June 30, 2021
in राजकीय
0

अक्कलकुवा | प्रतिनिधी
अक्कलकुवा ग्रामपंचायतीत झालेल्या कथित चार कोटी ७५ लाख रूपयांच्या गैरव्यवहार चौकशीअंती नंदुरबार जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी भ्रष्टाचारात दोषी असलेल्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्या आदेशास ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी स्गिती दिली होती. मात्र काल मंत्रालयात झालेल्या बैठकीला सदरची स्थगिती उठविण्यात आल्याने दोषींवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.
अक्कलकुवा ग्रामपंचायतीत सन २०१६ ते २०२० या कालावधीमध्ये कोटयावधी रूपयांचा भ्रष्टाचार झाल्याची तक्रार करण्यात आली होती. या तक्रारींची नंदुरबार जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी नेमलेल्या चौकशी समितीकडून चौकशी करण्यात आली. या भ्रष्टाचारात दोषी असलेल्या तत्कालीन सरपंच, प्रशासक, ग्रामविकास अधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुख्यकार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिले होते. यानिर्णयाला आव्हान देत संबंधितांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे धाव घेत गुन्हे दाखलच्या आदेशाला स्थगिती मिळविली होती. परंतु अक्कलकुवा ग्रामपंचायतील भ्रष्टाचाराबाबत काल दि.२९ जून रोजी ग्रामविकास मंत्रालयात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सुनावणीचे आदेश दिले होते. त्यानुसार सुनावणी झाली. सुनावणीत अक्कलकुवा ग्रामपंचायतीत झालेल्या भ्रष्टाचारातील सहभागतील असलेलयांवर गुन्हे दाखल करण्यास दिलेली स्थगिती उठविल्यामुळे आली आहे. या भ्रष्टाचारातील सहभागी व्यक्तींवर गुन्हे दाखलची टांगती तलवार आहे. या सुनावणीवेळी नंदुरबार जि.प. ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत शेखर रौंदळ, विस्तार अधिकारी बिराडे यांच्यासह अक्कलकुवा ग्रा.पं.चे उपसरपंच ताजमोहम्मद मकरानी उपसित होते. या सुनावणीला ग्रामपंचायतीच्या सरपंचा राजेश्‍वरी वळवी यांनी उपस्थित राहण्योच आदेश असतांनाही त्या उपस्थित राहिल्या नसल्याचे सुत्रांनी सांगितले.

बातमी शेअर करा
Previous Post

भालेर येथील कन्या विद्यालयात निवडी बद्दल सत्कार

Next Post

नंदुरबार जिल्हा २३ वर्षांचा झाला, मात्र कुपोषणाचा कलंक कायमच!

Next Post
नंदुरबार जिल्हा २३ वर्षांचा झाला, मात्र कुपोषणाचा कलंक कायमच!

नंदुरबार जिल्हा २३ वर्षांचा झाला, मात्र कुपोषणाचा कलंक कायमच!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहाद्याच्या सार्थक पाटीलला रोबोटिक्स ऑलिंपियाडमध्ये सुवर्णपदक

शहाद्याच्या सार्थक पाटीलला रोबोटिक्स ऑलिंपियाडमध्ये सुवर्णपदक

January 22, 2026
शाश्वत शेतीसाठी जैविक कीड नियंत्रण काळाची गरज; नंदुरबार कृषी महाविद्यालयात प्रशिक्षण

शाश्वत शेतीसाठी जैविक कीड नियंत्रण काळाची गरज; नंदुरबार कृषी महाविद्यालयात प्रशिक्षण

January 22, 2026
अविश्वास प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी, 27 जानेवारीला विशेष ग्रामसभेचे आयोजन

अविश्वास प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी, 27 जानेवारीला विशेष ग्रामसभेचे आयोजन

January 22, 2026
सहकार आयुक्त दिपक तावरे यांनी केली, पतसंस्थांच्या संगणकीकरणाच्या कामाची पाहणी

सहकार आयुक्त दिपक तावरे यांनी केली, पतसंस्थांच्या संगणकीकरणाच्या कामाची पाहणी

January 22, 2026
नंदुरबार जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा दिमाखदार समारोप; विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक प्रतिभेचा गौरव

नंदुरबार जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा दिमाखदार समारोप; विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक प्रतिभेचा गौरव

January 22, 2026
हिंदुत्वाचे सैनिक बनून संघटित व्हा आणि हिंदू मतांची वोट बँक स्थापन करा :  कालीचरण महाराज

हिंदुत्वाचे सैनिक बनून संघटित व्हा आणि हिंदू मतांची वोट बँक स्थापन करा : कालीचरण महाराज

January 22, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add