नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील वावद जवळ धुळे येथील एमआयडीसीमधून मद्य घेवून नंदुरबारकडे येत असणाऱ्या पिकअप व्हॅनवरील चालकाचा ताबा सुटल्याने वाहन उलटून अपघात घडला. यावेळी अनेकांनी संधी साधत काही मद्याचे खोके पळवून नेण्याचा प्रयत्न केला. तालुका पोलिसांना याप्रकरणी समजताच तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, धुळे येथील एमआयडीसीमधून काल मद्याची वाहतूक करणारी पिकअप व्हॅन नंदुरबारकडे येत होती. सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास नंदुरबार-दोंडाईचा रस्त्यावरील वावदजवळील वळणावर वाहनचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने वाहन उलटून अपघात घडला. मद्य घेवून जाणारे वाहन उलटल्याचे समजताच अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी संधी साधत अनेकांनी मद्याचे खोके पळविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पोहेकॉ.नाईक हे घटनास्थळापासून काही अंतरावर असल्याने तात्काळ त्यांनी घटनास्थळी धाव घेत वरिष्ठांशी संपर्क साधला. यामुळे मद्य पळवून नेण्याच्या बेतात असणाऱ्या अनेकांचा हिरमोड होत त्यांना केवळ घटनास्थळ बघ्याची भूमिका घ्यावी लागली. दरम्यान, नंदुरबार तालुका पोलिस निरीक्षक राहूलकुमार पवार यांच्यासह तालुका पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी व रनाळे पोलिस दूरक्षेत्राच्या पोलिसांनी घटनास्थळी जावून भेट दिली. तात्काळ सदरचा मद्यसाठा दुसऱ्या वाहनात नेण्यात आला. मात्र तोपर्यंत अनेकांनी संधी साधत मद्य पळवून नेले होते. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात कार्यवाही सुरु होती.