नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्हा कल्चरल अकॅडमीच्या अध्यक्षपदी राजेेश रघुवंशी, उपाध्यक्षपदी डॉ.विजय पटेल तर सचिवपदी प्रा.सुभाष मोरावकर यांची निवड करण्यात आली आहे.
नुकतीच नंदुरबार जिल्हा कल्चरल अकॅडमीची वार्षिक सभा येथे पार पडली. यावेळी नुतन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. यात जिल्हा कल्चरल अकॅडमीच्या अध्यक्षपदी राजेेश रघुवंशी, उपाध्यक्षपदी डॉ.विजय पटेल तर सचिवपदी प्रा.सुभाष मोरावकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. उवरित कार्यकारिणी उपसचिवपदी किरण दाभाडे, कोषाध्यक्षपदी राजेश अग्रवाल, संघटकपदी दुर्गेश वैष्णव व डॉ.सपना अग्रवाल, प्रसिध्दी प्रमुख राकेश बोरसे, मिडीया प्रमुखपदी शशिकांत हनवते तर संचालकांमध्ये डॉ.राजेंद्र कासार, प्राचार्य डॉ.मुकेश रघुवंशी, डॉ.सपना अग्रवाल, डॉ.राहूल मेघे, पंकज पाठक, श्रीराम मोडक यांची निवड करण्यात आली. यानंतर विविध विषयांवर चर्चा झाली. यात यंदाच्या वर्षी कोरोना योधांचा सत्कार, रांगोळी प्रशिक्षण व स्पर्धा, करावके गीत गायन स्पर्धा, देशभक्तीपर गायन व नृत्य स्पर्धा, कौन बनेगा जि.के.स्टार आदी कार्यक्रम घेण्यात येतील, असे सर्वानुमते ठरविण्यात आले. जितेंद्र खवळे, काशिनाथ सुर्यवंशी, अपूर्व पटेल, प्रवीण शर्मा, केशव राजभोज, चंपालाल चौधरी, कृष्णा बोरसे यांनी सभेचे संघटन केले. सभेत २३ सदस्य हजर होते.