नंदुरबार | प्रतिनिधी
अवैध गावठी हातभट्टी दारु वाहतुक करणार्या रिक्षावर विसरवाडी पोलीसांची छापा टाकुन ८९ हजार ८०० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २८ सप्टेंबर रोजी नवापूर तालुक्यातील बिजगांव गावातुन गावठी हातभट्टीची दारु एका पांढर्या रिक्षामध्ये नंदुरबार कडे वाहतुक होणार आहे. अशी विसरवाडी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी नितीन पाटील यांना खात्रीशिर बातमी मिळाल्याने, सपोनि नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई भुषण बैसाणे, पोकॉ लिनेश पाडवी, पोकॉ भोजराज धनगर, पोना राजु कोकणी, पोकॉ पिंटु पावारा यांच्या पथक बिजगांव गावाजवळ दबा धरुन बसले असता एक पांढर्या रंगाची ऍपे रिक्षा (क्र.जी.जे.०१, बी.यु -४०७२) बिजगांव रस्त्याने नंदुरबार कडे जातांना दिसली. सदरची रिक्षा संशय आल्याने थांबविली तपासणी केली रिक्षात एकुण ३० लिटर प्रत्येकी असे १६ रबरी ट्युब व १५ लिटर दारु असलेला एक ट्युब मिळाले असुन एकुन ४९५ लिटर गावठी दारु रिक्षासह एकुण ८९ हजार ८०० रुपये किमतीचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त कलेला आहे.
याप्रकरणी लिनेश पाडवी यांच्या फिर्यादीवरून राहुल चुनिलाल गावित (रिक्षा चालक), यशवंत बिलाड्या गावित, दोन्ही राहणार बिजगांव, पोस्ट मोग्राणी, ता. नवापुर, यांच्या विरध्द महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(ई), ६५(क), ८३ प्रमाणे विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन दोघांना अटक करण्यात आली आहे. सदरची कारवाई पोलीस अधिक्षक पी.आर.पाटील, अपर पोलीस अधिक्षक विजय पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्यामार्गदर्शनाखाली विसरवाडी पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.