नंदुरबार l प्रतिनिधी
अनेक वर्षापासून रानावनात भटकणारा कुठलाही प्रकारची शिक्षणाची सोय नाही सुख सुविधा नाही असा धनगर समाज आपल्या संघर्षमय जीवनात गेल्या अनेक दिवसापासून धनगर समाज एसटी आरक्षण मिळावे मेंढपाळांना कायमस्वरूपी वनचरे उपलब्ध करून द्यावी या मागणीसाठी युवाशक्ती अहिल्या सेनेचे निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांना निवेदन देण्यात आले.
या मागण्या संदर्भात धनगर समाज वारंवार आंदोलन निदर्शने करीत आहे परंतु कुठल्याही पक्षाच्या हाती सत्ता गेली तर धनगर समाजाच्या हाती मात्र निराशाच प्रत्येक वेळेस येते महाराष्ट्र राज्याच्या या महा राजकीय कुरुक्षेत्रात प्रथमच एकमेकांचे विरोध कट्टर प्रतिस्पर्धी असणारे राजकीय पक्ष तसेच नेतेमंडळी एकत्र येऊन महाराष्ट्रात सत्ता स्थापन करून घेतात तरीदेखील हा या महाराष्ट्राच्या राजकारणातील योगायोगच म्हणावे तसे बघितले तर धनगर समाजाला एसटी आरक्षण देऊ या संदर्भात भारतीय जनता पक्षाचे प्रमुख देवेंद्र फडणवीस यांनी देखील आश्वासन दिले होते.
तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या अनेक नेत्यांनी देखील धनगर समाजांना आरक्षण देऊ या संदर्भात आश्वासन दिले होते शिवसेनेने देखील सत्तेत आल्यानंतर आरक्षण देऊ असे सांगितले होते परंतु हे सर्व पक्ष एकमेकांच्या विरोधात असल्यामुळे या सर्व धनगर समाज एसटी आरक्षण अंमलबजावणी असेल मेंढपाळांचे मुद्दे असतील याकडे कदाचित लक्ष नसावे पण आता सर्वपक्षीय नेते आणि पक्ष एकत्र आल्यामुळे धनगर समाजाची प्रामुख्याने मागणी आहे की, धनगर समाजाला एसटी आरक्षण मध्ये आता कुठल्याही पक्षाचा विरोध डोळ्याला दिसत नाही त्यामुळे हा मुद्दा लवकरच राज्य सरकारने मार्गी लावून धनगर समाजाला न्याय द्यावा अशी समस्त धनगर समाजाच्या वतीने राज्यभरातून अपेक्षा व्यक्त होत आहे तसेच प्रशासनाला यावेळी युवाशक्ती अहिल्या सेना महाराष्ट्र राज्य च्या वतीने निवेदनाच्या माध्यमातून इशारा देण्यात आला आहे .
की आता जर धनगर समाजाला मेंढपाळांना आपल्या हक्काचे आरक्षण तसेच वन जमीन मिळाली नाही तर युवाशक्ती अहिल्या सेनेच्या वतीने राज्यभर आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशारा यावेळी संस्थापक अध्यक्ष मनोज कोळेकर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिला आहे .यावेळी युवा शक्ती अहिल्या सेना महाराष्ट्र राज्य चे महिला प्रदेश अध्यक्ष्या प्रतिभा धनगर, युवाशक्ती अहिल्या सेना महाराष्ट्र राज्य नंदुरबार तालुकाध्यक्ष संगीता पाटील, महिला आघाडीच्या शहराध्यक्ष लता रघुवंशी, महिला आघाडीच्या वंदना धनगर ,बारकू शिरोळे, दत्तू सूळ ,अशोक आजगे, गोयेकर, माखा कोळेकर, बाळू कोळेकर ,चुनीलाल बोरसे आदी उपस्थित होते.








