Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नादुरुस्त  एसटीचा प्रवाशांना मनस्ताप दिवे नसल्याने रात्रीचा प्रवास त्रासदायक

team by team
July 22, 2023
in राज्य
0
नादुरुस्त  एसटीचा प्रवाशांना मनस्ताप दिवे नसल्याने रात्रीचा प्रवास त्रासदायक
नंदुरबार  l   प्रतिनिधी
  सध्या पावसाळ्याचे दिवस असून नंदुरबार आगारातून लांब पल्ल्याच्या आणि विशेषतः रात्री सोडण्यात येणाऱ्या नादुरुस्त एसटीचा प्रवाशांना मनस्ताप होत असुन नाशिकहुन नंदुरबार प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नेहमी त्रास सहन करावा लागत असल्याने प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे. याबाबत  ग्राहक पंचायत संचलित प्रवासी महासंघाकडे प्रवाशांनी  गाऱ्हाणी मांडली आहेत.
प्राप्त माहितीनुसार नाशिक येथुन गुरुवार दि.20 जुलै रोजी सायंकाळी सहा वाजता एम. एच.- 20 .बी.एल.-2661 क्रमांकाची नंदुरबार – नाशिक एशियाड बस निघाली. 7 वाजता सोग्रस फाटा येथे  दिवे उपलब्ध नसल्याने  बस थांबविण्यात आली. बसचे बाहेरील दिवे उपलब्ध नव्हतेच. याशिवाय आतीलही दिवे बंद असल्याने चालकास बुकिंग करताना देखील अडथळे निर्माण होत असल्याचे दिसून आले.प्रवाशांकडील मोबाईलच्या बॅटरीद्वारे तात्पुरत्या स्वरूपात वायरचा जुगाड करून बसचे पुढील दिवे लावण्यात आले. एक तास खोंळबा झाला.नाशिक येथून प्रवास करणाऱ्या देवळा येथील पगार नामक एसटी चालकाने चालक, वाहक आणि प्रवाशांच्या मदतीने जेमतेम जुगाड करून दिवे  सुरू केले.
विशेष म्हणजे बसचे वायफर देखील बंद असल्याने  पावसात  चालकास अडचणी निर्माण झाल्या.सोग्रस येथून जेमतेम विरगावापर्यंत बस आली. याठिकाणी एका हॉटेलवर जेवणासाठी बस थांबली.मात्र दिवे नसल्याने बस पुढे मार्गस्थ होणार नाही.असे सांगून दुसऱ्या बसमधून प्रवास करण्याचे त्या वाहकाने सुचविले. त्यानंतर नाशिकहून एम. एच.14 के. क्यू.0247 क्रमांकाची दुसरी एशियाड बस आली. अखेर या बसमधून नंदुरबार ते नाशिक असा प्रवास करीत प्रवाशांना मनस्ताप झाला..सायंकाळी सहा वाजेला निघालेले प्रवासी रात्री एक वाजून दहा मिनिटांनी  नंदुरबारला  पोहोचले. त्रस्त प्रवाशांनी ग्राहक पंचायत संचलित प्रवासी महासंघाकडे  रात्र प्रवासातील नादुरुस्त एसटीबाबत गाऱ्हाणी मांडली आहेत.
विभाग नियंत्रकांनी लक्ष घालावे – प्रवासी महासंघाची मागणी
नंदुरबार आगारातून नाशिक मार्गावर सर्वाधिक बसेस धावतात. यातूनच  मोठ्या प्रमाणावर उत्पन्न प्राप्त होत आहे.धुळे विभागात जास्तीचे उत्पन्न देणाऱ्या नंदुरबार आगाराला सुस्थितीतील आणि नव्या बसेस उपलब्ध करून देण्याची मागणी धुळे विभागीय नियंत्रक विजय गीते यांच्याकडे
प्रवासी महासंघतर्फे करण्यात आली आहे.-
महादू हिरणवाळे, तालुकाध्यक्ष
ग्राहक पंचायत संचलित, प्रवासी महासंघ, नंदुरबार
बातमी शेअर करा
Previous Post

धनगर समाजाला एसटी आरक्षण मिळावे, युवाशक्ती अहिल्या सेनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Next Post

पोलीसांनी सामाजिक बांधिलकी जपत वाल्हेरी नदीवरील पुलाखालील गाळ काढला श्रमदानातून

Next Post
पोलीसांनी सामाजिक बांधिलकी जपत वाल्हेरी नदीवरील पुलाखालील गाळ काढला श्रमदानातून

पोलीसांनी सामाजिक बांधिलकी जपत वाल्हेरी नदीवरील पुलाखालील गाळ काढला श्रमदानातून

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add