नंदुरबार l प्रतिनिधी
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाअंतर्गत गुरुवार दि. २० जुलै रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.विविध संस्था आणि कंपन्यांतर्फे थेट रोजगाराची संधी उपलब्ध होणार असून लाभ घेण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.
नंदुरबार जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नंदुरबार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व फोर्ड फाउंडेशन आणि डेव्हलपमेंट सपोर्ट सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दि. 20 जुलै रोजी सकाळी दहा ते चार वाजेपर्यंत आय टी आय येथील मेस हॉलमध्ये रोजगार मेळावा होईल.नोकरीच्या शोधात असलेल्या युवकांनी संधीचा लाभ घेण्याचे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.








