Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

बेकायदेशीर भरती प्रक्रियेची चौकशी करण्याची मागणी

team by team
July 20, 2023
in राजकीय
0
बेकायदेशीर भरती प्रक्रियेची चौकशी करण्याची मागणी
नंदुरबार l प्रतिनिधी
येथील नॅशनल एज्युकेशन सोसायटी संचलित अलहाज काझी चिरागोद्दीन प्राथमिक, अँग्लो उर्दु माध्यमिक शाळा व ज्युनियर कॉलेजमध्ये मागील 12 ते 15 वर्षात बेकायदेशीर झालेल्या भरती प्रक्रियेतील नेमणुकांची सखोल चौकशी करुन दोषी आढळणार्‍यांवर तात्काळ गुन्हे नोंदवून कारवाई करण्याची मागणी विविध संस्था व संघटनाच्या पदाधिकार्‍यांनी केली आहे.
याबाबत नंदुरबार जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी व माध्यमिक, प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, नंदुरबार शहरात  नॅशनल एज्युकेशन सोसायटी संचलित अलहाज काझी चिरागोद्दीन प्राथमिक, अँग्लो उर्दु माध्यमिक शाळा व ज्युनियर कॉलेज आहे. या संस्थेच्या शाळेत गेल्या 12 ते 15 वर्षापासून बेकायदेशीर झालेल्या भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. गुणवत्ताधारक उमेदवारांची मुलाखत न घेता व परस्पर गुणवत्ता नसलेल्या उमेदवारांची परस्पर भरती करण्याचा प्रकार सुरु आहे.
मागील तीन महिन्यात दोन शिक्षकांची भरती करण्यात आली. या परस्पर होणार्‍या भरती प्रक्रियेने गुणवत्ताधारक उमेदवार वंचित राहत आहेत. नॅशनल एज्युकेशन सोसायटी संस्थेचे 2008 पासून कोणतेही विश्वस्त मंडळ अस्तित्वात नाही. त्यामुळे सदर संस्थेत तथाकथित कार्यकारी मंडळाकडून काम करण्यात येत आहे. तसेच विविध पदांवरील भरती ही गुणवत्तेवर आधारित होत नसल्याने बेकायदेशीरपणे भरती प्रक्रिया राबविली जात असल्याचे निदर्शनास येते. म्हणुन सदर प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषींवर गुन्हे दाखल करुन तात्काळ कायदेशीर कडक कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष जाकीर जहागीदार, नंदुरबार जिल्हा काँग्रेस सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष एजाज बागवान, शकील शेख, काँग्रेस अल्पसंख्यांक शहर विभाग अध्यक्ष असलम पिंजारी, अब्दुल नासिर मनियार आदींनी निवेदनातून केली आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

पावसात अडकलेल्यांसाठी ‘एसटी’ आली धावून

Next Post

पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे गुरुवारी आयोजन

Next Post
पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे गुरुवारी आयोजन

पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे गुरुवारी आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add