नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार भाजपा जिल्हाध्यक्ष म्हणून निलेश माळी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्षांची निवड लवकरच जाहीर होणार असल्याचे संकेत कधीपासूनच मिळाले होते. आज अखेर पक्षातर्फे जिल्हाध्यक्ष जाहीर केले आहेत.भारतीय जनता पक्षाने पक्षाध्यक्षपदांसाठी तरूण चेहऱ्यांना संधी दिली आहे. नंदूरबार जिल्हाध्यक्ष पदी निलेश माळी यांची नियुक्ती करण्यात आली. निलेश माळी विजय चौधरी यांचे खंदे समर्थक आहेत.








