नंदुरबार l प्रतिनिधी
येथील श्रीमती हि. गो. श्रॉफ हायस्कूलच्या विद्यार्थ्यानी महाराष्ट्र राज्य परिषद, पुणे मार्फत घेण्यात आलेल्या पूर्व उच्चप्राथमिक शिष्यवृत्ती (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) मध्ये एकूण १३ विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवले.
असून पूर्व माध्यमिक शिष्यवृत्तीत इ. ८ वीची कल्याणी बागुल हिने शहरी विभागातून जिल्ह्यात द्वितीय स्थान मिळवले आहे.
पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्तीत इ. ५ वीच्या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी अंशिका ज्ञानेश्वर चव्हाण, शांभवी दीपक कुलकर्णी, विराज सुभाष नागरे, सौम्या सुरेश अहिरे व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती इ. ८ वीच्या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी कल्याणी प्रशांत बागुल, मृदुला प्रशांत कासार, हेमश्री हिरालाल पाटील, अनुष्का राजेंद्र धनगर, वेदांत योगेश बारी, मृण्मयी तुषार कासार, श्रुती महेंद्र चौधरी, नेहल रविंद्र पाटील, भावेश दिनेश शेवाळे या गुणवंत विद्यार्थ्यांना भानुदास शास्त्री, जावेद धोबी, किशोर रौंदळ, नरेंद्र सूर्यवंशी, नरेंद्र माळी, अनिल मंडलिक, प्रतिभा साळुंखे, गायत्री पाटील, महेश पाटील या शिक्षकांनी मार्गदर्शन केले.
सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन अॅड. रमणलाल शाह, सचिव डॉ. योगेश देसाई, प्राचार्या सुषमा शाह, उपमुख्याध्यापक राजेश शाह,पर्यवेक्षक विद्या सिसोदिया, जगदीश पाटील, शिष्यवृत्ती परीक्षा विभाग प्रमुख सुनिल शाह तसेच सर्व शिक्षकवृंद यांनी कौतुक केले आहे.








