नंदूरबार. l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील रामपूर घरकुल घोटाळ्याचा चौकशी प्रकरणी, मोकाट असलेले आरोपी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, तसेच लाभार्थ्यांना त्यांच्या घरकुलाचे पैसे तात्काळ मिळावे, याकरिता विधान परिषदेचे आमदार आमच्या पाडवी यांचे अक्कलकुवा तहसील कार्यालयासमोर, आज 18 जुलै 2023 रोजी सकाळी अकरा वाजता रास्ता रोको आंदोलन होणार असल्या कारणाने नंदुरबार जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी जिल्हा प्रशासनाला अंकलेश्वर बऱ्हाणपूर या राष्ट्रीय महामार्गावरून वाहतुकीचा खोळंबा होऊ नये याकरिता, उपप्रादेशिक परिवहन विभाग तसेच नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक व जिल्हा प्रशासनातर्फे नागरिक वाहतूक वळविण्यात आली आहे.
अंकलेश्वर बन्हाणपूर महामार्गावरील तहसिल कार्यालय, अककलकुवा समोर सकाळी 11.00 वाजेपासून दि. 18 जुलै 2023 रोजी रास्ता रोको आंदोलन करणार असल्याने 18 जुलै 2023 रोजी सकाळी 6 वाजेपासून रास्ता रोको आंदोलन संपेपर्यंत राष्ट्रीय तसेच राज्य महामार्गावरील रहदारी अंशतः वळविण्यासाठी जिल्हादंडाधिकारी, नंदुरबार मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 33 (s) व मोटार वाहन अधिनियम, 1988 चे कलम 115 अन्वये जिल्हाधिकारी यांनी
अंकलेश्वर बऱ्हाणपूर महामार्गावरील तहसिल कार्यालय, अककलकुवा समोरील मुख्य रहदारी रस्त्यावरील वाहतूक खालील मार्गावरून वळविली आहे.यात सागबाराकडून तळोदाकडे जाणारी वाहने खापर येथून ब्राम्हणगांव, गंगथा, फुलवाडीमार्गे, कुकरमुंडा फाट्याकडे आणि तळोदाकडून खापरकडे जाणारी वाहने कुकरमुंडा फाटा, फुलवाडी, गंगथामार्गे खापरकडे. नंदुरबार- निझरकडून जाणारी वाहने फुलवाडी, गंगथामार्गे खापर व खापरकडून निझर-
नंदुरबारकडे जाणारी वाहने खापर, गंगथा, फुलवाडीमार्गे निझर- नंदुरबारकडे. सदर आदेशात नमूद मार्गावरील वाहतूक वळविली आहे.
उपप्रादेशिक परिवहन विभाग व पोलीस प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी व दक्षता घेण्यात यावी. त्याचप्रमाणे रास्ता रोको आंदोलनाच्या ठिकाणी व वाहतुक वळविणेत आलेल्याठिकाणी आवश्यक ते पथक, बेरेकेटींग, दिशा दर्शक फलक यासह योग्य तो पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे देण्यात आले आहेत.








