Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून गुन्हेगारांविरुध्द ऑपरेशन ऑल आऊट, धडक कारवाई

team by team
July 17, 2023
in क्राईम
0
नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून गुन्हेगारांविरुध्द ऑपरेशन ऑल आऊट, धडक कारवाई

नंदूरबार l प्रतिनिधी

 

नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून गुन्हेगारांविरुध्द ऑपरेशन ऑल आऊट, कोबींग, नाकाबंदी दरम्यान धडक कारवाई करण्यात आली.

आगामी सण व उत्सवाच्या पार्श्वभुमीवर समाजकंटकांवर व गुन्हेगारांवर अंकुश राहावा तसेच सण उत्सव भयमुक्त वातावरणात पार पाडावेत यासाठी खबरदारी म्हणून पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांच्या नेतृत्वाखाली 16 जुलै चे सायंकाळी 8 ते 17 जुलै चे सकाळी 6 वा. दरम्यान नंदुरबार जिल्ह्यात ऑपरेशन ऑल आऊट, कोबींग, नाकाबंदी राबविण्यात आले होते.

 

 

त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांचे मार्गदर्शनाखाली नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे हद्दीत ऑपरेशन ऑल आऊट राबविणेबाबत नियोजन केले. ऑपरेशन ऑल आऊट दरम्यान पोलीस ठाणे अभिलेखावरील सराईत गुन्हेगार, फरार, पाहिजे, फेर अटक आरोपी हिस्ट्रीशिटर्स, गँग हिस्ट्रीशिटर्स, अवैध शस्त्रे बाळगणारे, रात्रौ घरफोडी करण्याच्या उद्देशात असलेले, चोरीच्या वस्तू बाळगणारे, रात्री संशयीतरीत्या फिरणारे,ड्रंक अँड ड्राईव्ह, कारागृहातून सुटुन आलेले आरोपीतांचा शोध घेवुन जास्तीत जास्त गुन्हेगार ताब्यात घेवुन त्यांच्याविरुध्द् कायदेशीर कारवाई करण्याबाबतच्या तसेच मालमत्तेविरुध्दचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सुचना पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी सर्व उप विभागीय पोलीस अधिकारी व सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना दिल्या होत्या.

 

 

 

16 जुलै रोजी रात्री ऑपरेशन ऑल आऊट सुरु करण्यात आले. यासाठी नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील 18 अधिकारी व 122 अमलदार नेमण्यात आले होते व संपुर्ण ऑल आऊटचे नेतृत्व पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील तसेच अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे हे स्वतः नाकाबंदी,कोंबींग ऑपरेशन, ऑपरेशन ऑल आऊट बाबत सहभागी होवून जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांना भेटी देत होते. नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन, शहादा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी दत्तात्रय पवार, अक्कलकुवा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे यांच्यासह सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर असे सर्व आप-आपल्या पथकाचे नेतृत्व करुन कारवाई करीत होते.

 

 

17 जुलै रोजी रात्री 12 वाजता नंदुरबार शहरातील बागवान गल्ली, डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा, दो शाह तकिया इत्यादी परिसरात रूट मार्च करण्यात आला. नाकाबंदी दरम्यान म्हसावद पोलीस ठाणे हद्दीतील धडगांव रोडवरील चिखली फाटा येथे लावण्यात आलेल्या नाकाबंदीच्या ठिकाणी वाहनांची तपासणी करीत असतांना मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर वाहनामध्ये 7 प्लास्टीकच्या कॅनमध्ये 67 हजार 200 रुपये किमतीचे एकुण 210 लिटर दारु बनविण्यासाठी उपयोगी पडणारे स्पिरीट मिळून आल्याने स्पिरीट व वाहन असा एकुण 3 लाख 17 हजार 200 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करुन वाहन चालक दिलीप लक्ष्मण पावरा रा. चुंडीपाडा ता. शिरपूर जि. धुळे याच्याविरुध्द म्हसावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

ऑपरेशन ऑल आऊट दरम्यान शहादा पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरील 5 गुन्ह्यात सन 2021 पासून पाहिजे असलेला आरोपी प्रदिप शिवलाल ऊर्फ शिवल्या पावरा रा. ब्राम्हणपूरी ता. शहादा हा मिळून आल्याने त्यास ताब्यात घेवून गुन्ह्याच्या पुढील तपासकामी शहादा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.

 

 

तसेच नंदुरबार शहरातील नवापूर चौफुली परिसरात गणेश उत्तम गोसावी रा. गोसावीवाडा, नंदुरबार हा त्याच्या कब्जात शारीरिक दुखापत करण्यासाठी वापरता येईल असे टोकदार दाते असलेले फायटर कब्जात बाळगतांना बाळगून मनाई आदेशाचे उल्लंघन करतांना मिळून आला म्हणून त्याचेविरुध्द नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 (1) (3) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

चोरी करण्याच्या उद्देशाने तसेच स्वतःचे अस्तीत्व लपवुन संशयास्पदरीत्या फिरत असतांना मिळुन आलेले 7 रेकॉर्डवरील आरोपीतांविरुध्द् महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 122 प्रमाणे विविध पोलीस ठाणे गुन्हे दाखल करण्यात आले. त्यांचेकडून चोरी करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य हस्तगत करण्यात आले. तसेच 5 संशयीत इसमांच्या ताब्यात मिळुन आलेल्या मालमत्तेबाबत समाधानकारक उत्तरे न दिल्याने त्याच्याविरुध्द् जिल्ह्यातील विविध पोलीस पोलीस ठाण्यांमध्ये महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 124 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

 

नंदुरबार जिल्ह्यात प्रलंबीत असलेल्या नॉन बेलेबल वॉरंटपैकी एकुण 26 नॉन बेलेबल वॉरंट व 44 बेलेबल वॉरंटची बजावणी करण्यात आली. तसेच नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या अभिलेखावर असलेले 37 हिस्ट्रीशिटर्स तपासण्यात आले आहे. त्याचप्रमाणे नाकाबंदी दरम्यान 497 लहान व 288 मोठे असे एकुण 785 वाहनांची कसून तपासणी करण्यात आली.

 

 

नंदुरबार जिल्हा हद्दीतून हद्दपार केलेला इसम विपुल सुरेश कोळी रा. तिलाली ता. जि. नंदुरबार हा नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांची अथवा न्यायालयाची कोणतीही पुर्व परवानगी न घेता तिलाली येथे मिळून आल्याने त्याच्याविरुध्द् महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142 प्रमाणे नंदुरबार तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेले आहेत.

 

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन, शहादा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी दत्तात्रय पवार, अक्कलकुवा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी व अमंलदार यांनी केलेली असून पुढील काळात देखील ऑपरेशन ऑल आऊट (कोंबींग व नाकाबंदी) योजना संपुर्ण जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

सरपंचांनी पंचायत समितीच्या डोममध्ये थाटले कार्यालय 

Next Post

म्हसावद येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Next Post
म्हसावद येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

म्हसावद येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add