नंदूरबार l प्रतिनिधी
श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास , बालसुसंस्कार जिल्हा केंद्र नंदुरबार च्या वतीने जिल्ह्यात सुपर्जन्य वृष्टी व्हावी या करिता ग्राम देवत खोडाई माता मंदिरात इंद्रदेवतेची प्राणप्रतिष्ठा करून तेथून दिंडी काढून ग्रामदेवत मोठा मारुती येथे मानसन्मान करण्यात आला. व संकल्प करून इंद्र देवेतेच्या चरणी साकळ बांधण्यात आले.
संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यात दुष्काळाचे सावट येऊ नये. व नंदुरबार जिल्ह्यात सुपर्जन्यवृष्टी व्हावी आणि जिल्ह्यात अतिवृष्टी होऊ नये तसेच शेतकऱ्यांचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होऊ नये. शेतकऱ्यांचे कल्याण होऊन शेत जमीन सुजलाम सुफलाम होऊन शेतकऱ्यांचे कल्याण व्हावे हा या मागचा उद्देश आहे. पर्व २ रे बालसंस्कार व युवा प्रबोधन विभाग संकल्प १ कोटी महावृक्षारोपण अभियानाच्या माध्यमातुन वृक्ष लागवड व संवर्धन अशी प्रार्थना विनंती यावेळी करण्यात आली.








