नंदूरबार l प्रतिनिधी
हिंदूद्वेष्टा टिपू सुलतान याचा जयघोष करणाऱ्या गुंडांच्या विरोधात गुन्हे दाखल करा अशी मागणीचे निवेदन विविध हिंदू संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
या निवेदनात म्हटले आहे की, नंदुरबार शहरात स्वातंत्र्यवीर राणी लक्ष्मीबाई चौकात टिपू सुलतान या व्यक्तीच्या नावाचा फलक बेकायदेशीर लावण्यात आला होता. टिपू सुलतानचा इतिहास हा अतिशय काळाकुट्ट राहिलेला आहे. टिपू सुलतानने हिंदू बांधवांवर अतोनात अत्याचार केले होते, टिपूने तलवारीच्या धाक दाखवीत असंख्य हिंदूंचे धर्मांतरण केले व त्यांना मुसलमान धर्म स्वीकारण्यासाठी बळजबरी केली.
असा काळा इतिहास असलेल्या टिपू सुलतानचा बेकायदेशीर फलक प्रशासनाने कायदेशीर काढला. असे असताना काही धर्मांध मुस्लिम नेते टिपू सुलतान हा स्वातंत्र्य सैनिक होता तो इंग्रजांच्या विरोधात लढला, अशा प्रकारच्या बतावणी करत हिंदूंच्या भावनांच्या अनादर करीत आहे. काही माथेफिरू मुस्लिम तरुण टिपूचे स्टेटस ठेवत वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करीत आहे, हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावित आहेत. हिंदू हितरक्षक विजय चौधरी यांनी टिपू सुलतानचा बेकायदेशीर फलकाबद्दल तक्रार केली म्हणून त्यांना जीवे ठार मारण्याची भाषा करीत आहे.
अशा गावगुंडांचा त्वरित बंदोबस्त होऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, व त्यांच्यावर अटकेची कारवाही व्हावी अशी मागणी जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर भाजप व हिंदू प्रेरित संघटनाचे पदाधिकारी अजय कासार, खुशाल चौधरी, मयूर चौधरी, महेश चौधरी व भूषण पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.








