नंदूरबार l प्रतिनिधी
संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेंतर्गत सर्व लाभार्थ्यांना अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थसहाय्यात १००० रूपये वरून १५०० रूपये इतकी वाढ करण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे लाभार्थ्याच्या मुलाची २५ वर्ष वयाबाबतची अट रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे आता सबंध राज्यातील संजय निराधार गांधी योजनेच्यालाभार्थ्यांकरीता अच्छे दिन येणार आहेत.
संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना मिळणाऱ्या अर्थसहाय्यात वाढ करण्याबाबत लोकप्रतिनिधी, विविध दिव्यांग संघटना व स्वयंसेवी संस्था यांच्या माध्यमातून शासनाकडे वारंवार मागणी व पाठपुरावा येत तसेच करण्यात होता.
सन २०२३ – २४चा अर्थसंकल्प सादर करताना संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील पात्र लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्यात १००० रूपये वरुन १५०० अशी रूपये इतकी वाढ करण्यात येत आहे, त्यानुषंगाने सदरहू योजनेतंर्गत पात्र लाभार्थ्यांना देण्यात येणान्या अर्थसहाय्यात वाढ करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
त्यानुषंगाने २८जुन२०२३ रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता मिळाल्यानुसार संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील सर्व लाभार्थ्यांना देण्यात येत असलेल्या १००० रूपये इतक्या मासिक अर्थसहाय्यात५०० रुपये इतकी वाढ करुन अर्थसहाय्याची रक्कम दरमहा १५०० रुपये करण्यास याद्वारे शासनाने मान्यता दिली आहे. त्यानुसार एक अपत्य किंवा चार अपत्य असलेल्या विधवा लाभार्थ्यांना देखील अर्थसहाय्याची रक्कम दरमहा १५०० रूपये इतकी राहील, असा निर्णय घेण्यात आला असून त्या संदर्भातील आदेश पाच जुलै रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने काढण्यात आला आहे. संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांच्या मानधनात वाढ व्हावी अशी विविध संघटनेची इच्छा होती. त्या अनुषंगाने अपंग जनता दल सामाजिक संघटनेने मानधन वाढीबाबत मागणी करीत शासनाकडे पाठपुरावा सुरू ठेवला होता.
२७ जून २०२३ रोजी अपंग जनता दल सामाजिक संघटना चे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष आनंदा पाटील यांच्या नेतृत्वात मुंबई येथे मंत्रालयासमोर विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला होता मानधन हजार रुपयांवरून तीन हजार करण्याची मागणी केली होती.अखेर आज हा मानधन वाढीचा निर्णय झाल्याने या मोर्चा मुळे यश मिळाल्याने प्रदेशाध्यक्ष आनंदा पाटील यांना अपंग जनता दल सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्याकडून शुभेच्छा दिल्या जात आहेत.








