नंदुरबार l प्रतिनिधी
आ.रवी राणा आणि आ.नितेश राणे यांनी माजी मुख्यमंत्री तथा उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विषयी बेताल वक्तव्य केल्याच्या निषेधार्त नंदुरबार युवासेनेतर्फे जोडो मारो आंदोलन करुन तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.
युवासेना प्रमुख शिवसेना नेते आ.आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने तसेच युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई, विभागीय सचिव विराज कावडीया आणि नंदुरबार जिल्हा विस्तारक कुणाल कानकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार जिल्हा युवासेना जिल्हा अधिकारी अर्जुन मराठे यांच्यातर्फे आ.रवी राणा आणि आ.नितेश राणे यांनी माजी मुख्यमंत्री तथा उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विषयी बेताल वक्तव्य केल्याच्या निषेधार्त जोडो मारो आंदोलन करुन तीव्र निषेध नोंदविण्यात आला.
नितेश राणे आणि रवी राणा यांचे करायचे काय? खाली डोेके आणि वर पाय! अशाप्रकारे घोषणा देत यापुढे जर शिवसेना पक्ष प्रमुखांवर चुकीची भाषा वापरल्यास गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशारा देखील यावेळी युवासेनेतर्फे देण्यात आला. यावेळी युवासेनेचे जिल्हा अधिकारी अर्जुन मराठे, उपजिल्हा अधिकारी सागर पाटील, जिल्हा सचिव दिनेश भोपे, शहर प्रमुख राजधर माळी, युवासेना शहर प्रमुख दादा कोळी, आनंदा पाटील, घारु कोळी, राहुल चौधरी, रुपा भरवाड, छोटू चौधरी, पप्पू कोळी, विक्की कैकाडी, राहुल मराठे, धीरज घाटे आदी युवा सैनिक उपस्थित होते.








