नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार शहरातील बाहेरपुरा येथील एकास पोलिसांनी एका वर्षासाठी हद्दपारीचे आदेश असतांनाही नंदुरबार शहरात वावरतांना आढळून आल्याने त्याच्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे .
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार शहरातील बाहेरपुरा येथील संतोष दिलीप तिजविज यास दि .१ ९ सप्टेंबर २०२१ पासून नंदुरबार जिल्ह्या हद्दीतून १२ महिन्यांसाठी हद्दपारीचे आदेश दिले . मात्र संतोष तिजविज हा बाहेरपुरात परिसरात कोर्टाची परवानगी न घेता विनापरवाना वावरतांना आढळून आला . याबाबत पोशि . आनंदा मराठे यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम १४२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून संतोष तिजविज अटक करण्यात आली आहे . पुढील तपास पोना.दिनकर घुले करीत आहेत .
