नंदुरबार | प्रतिनिधी
जिल्हयातील सर्व न्यायालयातील तडजोडक्षम प्रलंबित फौजदारी, दिवाणी, मोटार अपघात दावे प्रकरणे,वाहतुक नियमन प्रकरणे, व दाखलपुर्व प्रकरणांमध्ये वीज, पाणीपट्टी, घरपट्टी व बँका यांचे थकीत बिले यांची ३१०८ प्रकरणे शनिवार दि.२५ सष्टेंबर रोजी झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये आपसात तडजोडीने निकाली काढण्यात आली.यात ४ कोटी ८ लाख ४५ हजार १२६ रुपये वसुल करण्यात आले.
या लोकन्यायालयाच्या प्रसंगी प्रमुख जिल्हा व सत्र न्या.आर.एस.तिवारी व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव डि.व्ही हरणे, यांचे उपस्थितीत नंदुरबार मुख्यालयात तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१ ए.एस.भागवत,वरिष्ठ स्तर दिवाणी न्या.एस.टी.मलिये, मुख्य न्यायदंडाधिकारी न्या.व्ही.जी.चव्हाण, यांनी पॅनल प्रमुख म्हणुन काम पाहिले यांच्या मदतीसाठी विधी महाविदयालयाचे प्राचार्य ऍड.एन.डी.चौधरी, ऍड.सीमा खत्री,ऍड.शारदा पवार,ऍड.प्रियंका गावीत, ऍड.चतुर पाटील,ऍड.जाकीर पिंजारी,यांनी सदस्य म्हणुन काम पाहिले. तसेच कनिष्ठ स्तर १ले सह दिवाणी न्या.वाय के राऊत, कनिष्ठ स्तर २ रे सह दिवाणी न्या.एन.बी.पाटील, तसेच सदर लोकअदालतीच्या प्रसंगी नवीन नियुक्त न्यायिक अधिकारी एस.एस.बडगुजर,ए.आर कुलकर्णी, एस.बी.मोरे, पी.एम.काजळे, आरती बनकर.एम.बी.पाटील,एस.आर.पाटील हजर होते. व त्यांनी सहभाग नोदविला.व किरकोळ स्वरूपाची फौजदारी प्रकरणे तातडीने निकाली करण्यासाठी स्पेशल ड्राईव्ह चे कामकाज केले. तसेच सदर लोकन्यायालयाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा न्यायालयातील प्रबंधक आर.जी.वाणी, वकिल संघाचे अध्यक्ष ऍड.कमलाकर सावळे, न्यायालयीन कर्मचारी व विधिज्ञ यांनी मोलाचे सहकार्य केले.सदरच्या लोकन्यायालयात ३१०८ प्रकरणे सामंजस्याने निकाली काढण्यात येवून ४ कोटी ८ लाख ४५ हजार १२६ रुपये वसुल करण्यात आले.तर वाहतुक नियमनाच्या १८२७ प्रकरणात १५ लाख ३९ हजार ८०० रूपये वसुल करण्यात आले.
जिल्हयातील निकाली झालेल्या न्यायालयातील एकुण प्रलंबित प्रकरणांची आकडेवारी दिवाणी ३२ प्रकरणात ५ लाख ३६ हजार ४२०,मोटार अपघात १९ प्रकरणात ६१ लाख ९० हजार,चलनक्षम धनादेशच्या ४८ प्रकरणात ६९ लाख ६५ हजार ८६८,कौटूंबिक वादाची १६ प्रकरणे निकाली काढण्यात आली तर फौजदारी १८ प्रकरणात १५ हजार ४००,बॅक वसुलीच्या ४ प्रकरणात ७ लाख २३ हजार ३४४, इतर किरकोळ फौजदारी ७०८ प्रकरणात २ लाख १३,८५० अशा एकुण ८४५ प्रकरणात १ कोटी ४६ लाख ४४ हजार८८२ रुपये वसुल करण्यात आले.तसेच जिल्हयातील एकुण दाखलपूर्व ४३६ प्रकरणांमध्ये बैंक वसुलीच्या २१३ प्रकरणात २ कोटी ४४ लाख १७ हजार २५९, वीज थकबाकी वसुलीच्या ४ प्रकरणात ९ हजार ९५५,पाणीपट्टी,घरपट्टीच्या १७४ प्रकरणात १ लाख ८८ हजार २३०, पेटी केसेसच्या ४५ प्रकरणात ४५ हजार रुपये याप्रमाणे ४३६ प्रकरणात २ कोटी ४६ लाख ६० हजार ४४४ रुपये वसुल करण्यात आली.अशा प्रकारे संपुर्ण जिल्हयातुन ३१०८ खटल्यामधुन ४ कोटी ८लाख ४५ हजार १२६ रुपये वसुल करण्यात आले.