नंदुरबार l प्रतिनिधी
धडगाव तालुक्यातील कंजापाणी देवबारपाडा येथे शेती हिस्से वाटणीवरुन घरावर दगडफेक केल्याने दोघांना दुखापत झाली असून याबाबत पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धडगाव तालुक्यातील धजापाणी देवबारपाडा येथील हिरालाल कुंभाऱ्या पावरा व ओपाऱ्या जंगल्या पावरा यांच्यात शेती हिस्से वाटणीवरुन हिरालाल पावरा यांच्या घरावर ओपाऱ्या जंगल्या पावरा, दिलीप ओपाऱ्या पावरा, सायसिंग ओपाऱ्या पावरा, उदसिंग ओपाऱ्या व सेवा ओपाऱ्या पावरा यांनी दगडफेक केली. यामुळे घराचे कौले फुटून हिरालाल पावरा यांचे वडील कुंभाऱ्या खाज्या पावरा व बहिण वायसीबाई कुंभाऱ्या पावरा यांना दुखापत झाली. तसेच पाचही जणांनी हिरालाल पावरा व साक्षीदार यांना शिवीगाळ करीत जिवेठार मारण्याची धमकी दिली.
याबाबत हिरालाल पावरा यांच्या फिर्यादीवरुन धडगाव पोलिस ठाण्यात पाच जणांविरोधात भादंवि कलम ३२४, १४३, १४७, १४८ १४९, ४२७, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहेे. पुढील तपास पोहेकॉ.स्वप्निल गोसावी करीत आहेत.








